Pune News : गणेशोत्सवात नियमांच्या मर्यादेत राहून उत्सव साजरा करा
Pune News : पुणे : पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना शहरातील विविध गणेश मंडळे, विसर्जन मिरवणुका आणि प्रमुख ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
1 min read

Pune News : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे पुणेकरांना आवाहन
Pune News : पुणे: पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना शहरातील विविध गणेश मंडळे, विसर्जन मिरवणुका आणि प्रमुख ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागरिकांच्या सुरक्षेला आणि गर्दीच्या व्यवस्थापनाला प्राधान्य देत नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
महाराष्ट्र मिररच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था, क्राऊड मॅनेजमेंट आणि नागरिकांची जबाबदारी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.https://maharashtramirror.com/ Pune news
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि नागरिकांची सुरक्षितता कायम राहावी, यासाठी पोलिसांकडून आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करणे महत्त्वाचे असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.
उत्सवाचा आनंद घेत असताना नागरिकांनी आपली जबाबदारीही लक्षात ठेवावी. नियम आणि कायद्याच्या मर्यादेत राहून गणेशोत्सव साजरा करा, पोलिसांना सहकार्य करा आणि स्वतःसोबतच इतर नागरिकांच्या सुरक्षेचीही काळजी घ्या, असे आवाहन अमितेश कुमार यांनी केले.
गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे उत्साह, भक्ती आणि जल्लोषासोबत शिस्त आणि सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यास मदत होईल, असा संदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिला.


