Skip to content

Pune News : पोलिस आयुक्तांनी केला प्रामाणिक सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांचा सत्कार

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात भाडे न नाकारता आणि मीटरप्रमाणे प्रामाणिकपणे प्रवास सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांचा पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

पोलिस आयुक्तांनी केला प्रामाणिक सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांचा सत्कार
पोलिस आयुक्तांनी केला प्रामाणिक सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांचा सत्कार

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात भाडे न नाकारता आणि मीटरप्रमाणे प्रामाणिकपणे प्रवास सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांचा पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. पुणे रेल्वे स्थानक आवारात गुरूवारी (दि.२७) ‘पुणे रिक्षा चालक युनियन (एन) सावधान’ या संघटनेच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, रेल्वे पोलीस अधिकारी प्रमोद खोपीकर, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, रिक्षा शाहू फुले आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिवराज माळवदकर यांची प्रमुखउपस्थिती होती.https://maharashtramirror.com/ Pune News

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रामाणिक रिक्षाचालकांचा सत्कार करण्याचे हे पाऊल अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगितले. तसेच, पुणे स्टेशन परिसरात मोठ्या संख्येने येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी शिस्त पाळणे आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियमांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, मोठ्या हॉलमध्ये लवकरच सर्व चांगल्या रिक्षाचालकांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमास बंडगार्डन पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार तसेच रेल्वे स्थानकातील प्रवासी आणि नागरिक उपस्थित होते.

Share