Skip to content

Pune News : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या तैलचित्रावरून पुणे महापालिकेत राडा;

Pune News : पुणे महापालिकेत भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या तैलचित्रावरून पुणे महापालिकेत राडा; बालवडकरांच्या उपसूचनेवर गदारोळ!
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या तैलचित्रावरून पुणे महापालिकेत राडा; बालवडकरांच्या उपसूचनेवर गदारोळ!

Pune News : बालवडकरांच्या उपसूचनेवर गदारोळ!

Pune News : पुणे महापालिकेत भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या तैलचित्र लावण्याच्या प्रस्तावावरून मंगळवारी झालेल्या मुख्य सभेत मोठा वाद पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मांडलेल्या एका उपसूचनेमुळे सभागृहात राजकीय वातावरण तापले.  महापालिकेच्या प्रत्येक नगरसेवकाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी किमान दहा मिनिटे मनोगत व्यक्त करावे, अशी उपसूचना अमोल बालवडकर यांनी मांडली.  बालवडकरांच्या या उपसूचनेवर भाजप सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. बालवडकरांनी आपले वक्तव्य मागे घेऊन सभागृहाची माफी मागावी, अशी आक्रमक मागणी भाजप नगरसेवकांनी केली, ज्यामुळे सभागृहात काही वेळ गदारोळ माजला.https://maharashtramirror.com/ Pune News

Share