Skip to content

Pune News : वाहतूक नियोजनासाठी पुणे महानगरपालिका घेणार ‘रिअल टाइम’ डेटाचा आधार

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी, अपघातप्रवण ठिकाणे आणि रस्त्यांच्या समस्यांवर अधिक परिणामकारक व शाश्वत उपाययोजना करण्यासाठी पुणे महानगरपालिका आता ‘रिअल टाइम ट्रॅफिक डेटा’चा प्रभावी वापर करणार आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

वाहतूक नियोजनासाठी पुणे महानगरपालिका घेणार ‘रिअल टाइम’ डेटाचा आधार
वाहतूक नियोजनासाठी पुणे महानगरपालिका घेणार ‘रिअल टाइम’ डेटाचा आधार

Pune News : ‘पुणे अर्बन मोबिलिटी सेल’ स्थापन करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी, अपघातप्रवण ठिकाणे आणि रस्त्यांच्या समस्यांवर अधिक परिणामकारक व शाश्वत उपाययोजना करण्यासाठी पुणे महानगरपालिका आता ‘रिअल टाइम ट्रॅफिक डेटा’चा प्रभावी वापर करणार आहे. विविध यंत्रणांकडून उपलब्ध होणारा वाहतूक व प्रवासविषयक डेटा एकत्रित करून त्याआधारे वाहतूक नियोजन, रस्ते विकास आणि पायाभूत सुविधांबाबत अचूक निर्णय घेण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव महापालिकेच्या पथ विभागाने तयार केला आहे. या सर्वंकष उपाययोजनेमुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्थापनाचे चित्र आगामी काळात पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ‘पुणे अर्बन मोबिलिटी सेल’ स्थापन करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. यासाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी सल्लागार म्हणून नामांकित कंपनी ‘अर्न्स्ट अँड यंग एलएलपी’ (EY) ची नियुक्ती करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. या सल्लागार कामासाठी दरवर्षी २ कोटी ३७ लाख रुपये (करविरहित) खर्च अपेक्षित आहे. या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी अधिकृत मान्यता दिल्याची माहिती दिली आहे. या सेलच्या माध्यमातून वाहतूक समस्यांच्या शास्त्रीय विश्लेषणाला गती मिळणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

महापालिका आणि शहर वाहतूक पोलिसांमध्ये अधिक चांगला समन्वय साधण्यासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन कक्ष उभारण्यात येणार आहे. ढोले रस्ता परिसरात प्रस्तावित असलेल्या या विशेष कक्षात महापालिकेची सुमारे दहा जणांची समर्पित टीम तसेच ‘एससीएमटीआर’ची टीम एकत्रितपणे कार्यरत राहणार आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत किंवा वाहतूक कोंडीच्या वेळी तातडीने निर्णय घेणे सुलभ होणार आहे. शहरातील वाहतुकीचा सखोल अभ्यास करण्यासाठी अनेक स्रोतांकडून माहिती गोळा केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने टॉम टॉम (TomTom) आणि दूरसंचार कंपन्यांकडील प्रवासविषयक माहिती, शहरातील सीसीटीव्ही फुटेज आणि महाप्रीतची यंत्रणा पुणे अर्बन ॲप, रोड मित्र ॲप आणि जीपीएस आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, वाहनतळ (पार्किंग) व्यवस्थापन आणि नागरिक तक्रार निवारण प्रणाली, रस्ते मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली (RAMS), जीआयएस मॅपिंग आणि रस्ता बांधकाम व्यवस्थापन प्रणाली, ट्रेंचिंग पोर्टलवरील रस्ते खोदकामाची माहिती या सर्वाचा समावेश असणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

या सर्व विविध स्रोतांतून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक सर्वसमावेशक ‘एकात्मिक वाहतूक नियोजन व व्यवस्थापन मंच’ विकसित करण्यात येणार आहे. शहरातील वाहतूक कोंडीची ठिकाणे, वारंवार अडथळे निर्माण होणारे मार्ग आणि अपघातप्रवण क्षेत्रे (ब्लॅक स्पॉट्स) ओळखून त्यावर तत्काळ उपाययोजना करणे याद्वारे शक्य होईल. https://maharashtramirror.com/ Pune News

विशेष म्हणजे, वाहतूक कोंडीचा थेट संबंध खड्डे, रस्त्यांची खराब अवस्था, भूमिगत सेवा वाहिन्यांसाठी केलेले अनियोजित खोदकाम आणि नागरिकांच्या तक्रारींशी जोडून समस्येच्या मूळ कारणांचा शोध घेतला जाणार आहे. तसेच, महापालिकेमार्फत कोणतीही उपाययोजना करण्यापूर्वी आणि ती केल्यानंतर वाहतुकीवर नेमका काय परिणाम झाला, याचे वस्तुनिष्ठ मोजमापही केले जाईल.https://maharashtramirror.com/ Pune News

‘रिअल टाइम’ डेटाच्या अचूक विश्लेषणावरून शहरात नवीन उड्डाणपूल (फ्लायओव्हर), ग्रेड सेपरेटर आणि इतर मोठ्या वाहतूक प्रकल्पांची नेमकी गरज कुठे आहे, हे निश्चित करणे सोपे होईल. त्यामुळे केवळ वाहतूक कोंडी झाल्यानंतर प्रतिक्रिया देण्याऐवजी, भविष्यातील वाहनांच्या वाढत्या दबावाचा अंदाज घेऊन आधीपासूनच नियोजन करण्यावर पालिकेचा भर राहणार आहे.

तसेच, RAMS प्रणालीचा अन्य डिजिटल डेटाबेसशी समन्वय साधल्यास पालिकेच्या तिजोरीतील मर्यादित निधी कोणत्या रस्त्यांवर प्रथम खर्च करावा, कोणते रस्ते अधिक मजबूत करावेत किंवा पुनर्बांधणीची गरज कुठे आहे, आणि भविष्यातील देखभालीसाठी नेमका किती निधी लागेल, याबाबतचे आर्थिक व तांत्रिक निर्णय घेणे अत्यंत सुलभ होणार आहे. या आधुनिक धोरणामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि प्रदीर्घ वाहतूक कोंडीमुक्त होईल अशी अपेक्षा आहे.

Share