Pune PMC News : खराडी-केशवनगर पूल १५ ऑगस्टला वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना
पुणे, महाराष्ट्र मिरर : Pune PMC News : नॉर्थ मेन रोडवरील एबीसी फार्म चौक ते ताडीगुत्ता चौक या रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या सेवावाहिन्या तातडीने स्थलांतरित कराव्यात.
1 min read

रुंदीकरणातील अडथळा ठरणाऱ्या सेवावाहिन्या तातडीने हटवा : आयुक्त नवल किशोर राम
एबीसी फार्म चौक–ताडीगुत्ता चौक रस्त्याची पाहणी; उर्वरित भूसंपादन तातडीने करण्याचे आदेश
पुणे, महाराष्ट्र मिरर : Pune PMC News : नॉर्थ मेन रोडवरील एबीसी फार्म चौक ते ताडीगुत्ता चौक या रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या सेवावाहिन्या तातडीने स्थलांतरित कराव्यात. तसेच उर्वरित भूसंपादन प्रक्रिया तातडीने सुरू करून रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने पूर्ण करावे, असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. Pune PMC News : Maharashtra Mirror
महापालिका आयुक्त राम यांनी सोमवारी या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, पथ विभागाचे प्रमुख अभियंता राजेश बनकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. रस्त्याच्या कामात विविध सेवावाहिन्यांमुळे येणारे अडथळे दूर करण्याबरोबरच प्रलंबित भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. Pune PMC News :

यानंतर आयुक्तांनी हडपसर रेल्वे स्टेशन रस्त्याची पाहणी केली. या ठिकाणी सुरू असलेली पावसाळी वाहिनी आणि ड्रेनेज लाइनची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. हडपसर रेल्वे स्टेशन रस्त्यावरील वाहनांची मोठी वर्दळ लक्षात घेता हा प्रकल्प महत्त्वाचा असून, कामात कोणताही अडथळा येऊ न देता ते लवकर पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि तज्ज्ञ सल्लागारांना करण्यात आल्या. Pune PMC News

आयुक्त राम यांनी खराडी-केशवनगर पुलाच्या कामाचीही पाहणी केली. नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन हा पूल १५ ऑगस्ट रोजी वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना त्यांनी मुख्य अभियंता (पथ) यांना दिल्या. मात्र, पूल खुला झाल्यानंतरही अॅप्रोच रोडची उर्वरित कामे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. Pune PMC News

अॅप्रोच रोडची कामे सुरू असताना नागरिक आणि वाहनचालकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे. रस्ता रुंदीकरण, हडपसर रेल्वे स्टेशन रस्ता आणि खराडी-केशवनगर पूल या तिन्ही प्रकल्पांतील प्रलंबित कामांना गती देण्यावर आयुक्तांनी पाहणीदरम्यान भर दिला.


