Pune news : पुणे महापालिकेतील भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर
Pune News पुणे महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असूनही मागील सहा महिन्यांत पक्षांतर्गत असंतोष आणि गटबाजी उफाळून आली आहे.
2 min read

Pune News : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ घेणार नगरसेवकांची ‘शाळा’
Pune News पुणे महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असूनही मागील सहा महिन्यांत पक्षांतर्गत असंतोष आणि गटबाजी उफाळून आली आहे. महापालिकेतील कारभार, धोरणात्मक निर्णय आणि निविदा प्रक्रियेवरून नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. काही नाराज नगरसेवकांनी थेट मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतल्याची चर्चा असून, या वाढत्या अंतर्गत विसंवादाला लगाम घालण्यासाठी आता खुद्द केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मैदानात उतरले आहेत. महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेपूर्वी मोहोळ सर्व नगरसेवकांची विशेष बैठक घेऊन त्यांची ‘शाळा’ घेणार असून, या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
एकहाती सत्ता असूनही नाराजीचे ढग
पुणे महानगरपालिका निवडणुकीत पुणेकरांनी भाजपच्या पारड्यात घसघशीत मते टाकत एकहाती सत्ता दिली. तब्बल १२६ हून अधिक नगरसवेक भाजपचे असले, तरी सत्तेच्या अवघ्या सहा महिन्यांतच नगरसेवकांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेत झालेले धोरणात्मक निर्णय, मंजुर होणाऱ्या निविदा आणि प्रभागांमध्ये अपुरा निधी मिळत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या आहेत. तसेच, महापालिका वर्तुळात प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय नसून सभागृहात पुरेशी बोलण्याची संधी मिळत नसल्याची खंतही काही सदस्यांनी खासगीत व्यक्त केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव
महापालिकेच्या कारभाराबाबत केवळ पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे असे नाही, तर भाजपच्या काही असंतुष्ट नगरसेवकांनी एकत्र येत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. महापालिका पातळीवरील या वाढत्या गटबाजीची आणि असंतोषाची गंभीर दखल पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे समजते. पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये आणि प्रशासनावर वचक राहावा, यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आल्याचे बोलले जात आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
‘डॅमेज कंट्रोल’साठी मोहोळ पुढे सरसावले
या सर्व पार्श्वभूमीवर पक्षातील वाढती फूट आणि नाराजी दूर करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. महापालिकेतील नगरसेवकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी मोहोळ यांनी एका विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत नगरसेवकांना कामकाजाची सखोल माहिती, मार्गदर्शन आणि शिस्तीचा कानमंत्र दिला जाणार आहे. प्रशासनासोबत कसा समन्वय ठेवावा आणि प्रभागातील विकासकामांना कसा वेग द्यावा, याचे धडे या बैठकीत दिले जाण्याची शक्यता आहे.
गुरुवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. नाराज नगरसेवकांच्या रोषावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ काय तोडगा काढतात आणि या ‘शाळे’चा पक्षांतर्गत सुसंवादासाठी किती फायदा होतो, हे आगामी काळात स्पष्ट होईल.


