Skip to content

Pune News : पदपथांवर ८८ कोटींची खैरात कुणासाठी?

पुणे, धनश्री ओतारी : पुणे महानगरपालिकेच्या अजब कारभाराचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.

VK
Vikrant Kulkarni

4 min read

पदपथांवर ८८ कोटींची खैरात कुणासाठी?
पदपथांवर ८८ कोटींची खैरात कुणासाठी?

Pune News : पावसामुळे पुण्यातील सर्व रस्त्यांची चाळणी झाली असताना फक्त पादचारी मार्गांसाठी उधळपट्टीचा प्रस्ताव

पुणे, धनश्री ओतारी : पुणे महानगरपालिकेच्या अजब कारभाराचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. एकीकडे शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि खराब पृष्ठभागामुळे पुणेकर नागरिक व वाहनचालक त्रस्त झालेले असताना, दुसरीकडे महानगरपालिकेने शहरभरातील पदपथांच्या पुनरुज्जीवन आणि दुरुस्तीसाठी तब्बल ८८ कोटी रुपयांचा भरभक्कम निधी खर्च करण्याचा घाट घातला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांचे पदपथ हे करोडो रुपये खर्चून आधीच चांगले बनवले असताना आणि शहरातील बहुसंख्य रस्त्यांच्या पदपथांवर अतिक्रमणे झाली असताना नागरिकांना चालणे देखील कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत कोट्यवधी रुपये खर्चून चांगल्या स्थितीत असणारे पादचारी मार्ग खणून ते नवीन बनवण्याचा घाट कुणासाठी घातला जात आहे? हा प्रश्न उपस्थित होतो. या निर्णयामुळे प्रशासकीय प्राधान्यक्रमावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरी कार्यकर्ते व माजी लोकप्रतिनिधींनी या प्रस्तावाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

इतक्या मोठ्या रकमेच्या कामासाठी इतका कमी कालावधी
पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाने या ८८ कोटी रुपयांच्या कामासाठी अवघ्या सात दिवसांची अल्पमुदतीची निविदा मागवण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला आहे. या प्रक्रियेमुळे स्पर्धा वाढून अनुभवी कंत्राटदार पुढे येतील, असा दावा पालिका प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, इतक्या मोठ्या रकमेच्या कामासाठी इतका कमी कालावधी दिल्याने निवडक ठेकेदारांचेच भले करण्याचा प्रयत्न आहे का, अशी शंका विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

निधी पुणेकरांसाठी नसून ठेकदारांसाठी
गेल्याच वर्षी रस्ते विभागाने निविदा प्रक्रियेशिवाय पदपथांच्या दुरुस्तीवर सुमारे १५ कोटी रुपये खर्च केले होते. तर आता ८८ कोटी रुपयांचा घाट घातला आहे. हा निधी पुणेकरांसाठी नसून ठेकदारांसाठी आहे. फुटपाथचा वापर नागरिक किती करतात आणि व्यावसायिक किती करतात याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. जर इतका निधी खर्च केला जात असेल तर त्याचा फायदा व्यावसायिकांना न होता नागरीकांनाच झाला पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते उज्ज्वल केसकर म्हणाले, "गेल्याच वर्षी रस्ते विभागाने निविदा प्रक्रियेशिवाय पदपथांच्या दुरुस्तीवर सुमारे १५ कोटी रुपये खर्च केले होते. तर आता ८८ कोटी रुपयांचा घाट घातला आहे. हा निधी पुणेकरांसाठी नसून ठेकदारांसाठी आहे. फुटपाथचा वापर नागरिक किती करतात आणि व्यावसायिक किती करतात याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. जर इतका निधी खर्च केला जात असेल तर त्याचा फायदा व्यावसायिकांना न होता नागिकांनांच झाला पाहिजे."https://maharashtramirror.com/ Pune News

मागील खर्चाचा हिशोब कुठे?
या नव्या प्रस्तावामुळे महापालिकेच्या कामकाजातील पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. अहवालानुसार, गेल्याच वर्षी रस्ते विभागाने निविदा प्रक्रियेशिवाय पदपथांच्या दुरुस्तीवर सुमारे १५ कोटी रुपये खर्च केले होते. हा निधी नेमक्या कोणत्या रस्त्यांवर खर्च झाला, कामांचे स्वरूप काय होते आणि कामे कधी पूर्ण झाली, याचा कोणताही अधिकृत तपशील अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. त्यामुळे मागील खर्चाचा हिशोब न देता पुन्हा ८८ कोटींचा घाट कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

स्मार्ट सिटी आणि इतर प्रकल्पांतर्गत शहरातील बहुतांश प्रमुख रस्त्यांवरील पदपथ आधीच सुस्थितीत आहेत. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, सेनापती बापट रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, विद्यापीठ रस्ता, औंध रस्ता, पाषाण रस्ता, बाणेर रस्ता आणि औंध आयटीआय रस्ता. पुणे रेल्वे स्टेशन, ढोले पाटील रोड, कोरेगाव पार्क, हडपसर, मुंढवा, कोंढवा, बिबवेवाडी, सहकारनगर, शिवदर्शन आणि सॅलिसबरी पार्क या भागांतही उत्तम पदपथ उपलब्ध आहेत.असे असताना केवळ उपलब्ध झालेला निधी खर्ची पाडण्यासाठी चांगले पदपथ पाडून पुन्हा बांधले जात आहेत का, असा गंभीर आरोप केला जात आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

या पार्श्वभूमीवर निधीचा योग्य वापर करण्याची मागणी
माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे. तसेच, महापालिका प्रशासनाला या प्रस्तावाचा त्वरित फेरविचार करण्याचे आवाहन केले आहे. शहरात आधी रस्त्यांवरील खड्डे बुजवून ते वाहतुकीयोग्य करणे गरजेचे असताना, अशा अवाजवी खर्चाला प्राधान्य देणे म्हणजे करदात्या पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी ठरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. नवीन प्रकल्पांना मंजुरी देण्यापूर्वी संपूर्ण शहरात पदपथांच्या सद्यस्थितीचे निष्पक्ष सर्वेक्षणाद्वारे मूल्यमापन करावे आणि प्रत्यक्ष गरजेनुसारच निधीचे वाटप करावे, अशी ठाम मागणी आता जोर धरू लागली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

महत्वाचे मुद्दे
*पथ विभागाने ८८ कोटी रुपयांच्या कामासाठी अवघ्या सात दिवसांची अल्पमुदतीची निविदा मागवण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी केला सादर
*स्पर्धा वाढून अनुभवी कंत्राटदार पुढे येतील असा पालिकेचा दावा
*निवडक ठेकेदारांचेच भले करण्याचा प्रयत्न असल्याची शंका विरोधकांकडून व्यक्त
*पुणे पालिकेच्या प्राधान्यक्रमावर नागरिक व लोकप्रतिनिधींचा तीव्र आक्षेप
*प्रस्तावामुळे महापालिकेच्या कामकाजातील पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थितhttps://maharashtramirror.com/ Pune News


"गेल्याच वर्षी रस्ते विभागाने निविदा प्रक्रियेशिवाय पदपथांच्या दुरुस्तीवर सुमारे १५ कोटी रुपये खर्च केले होते. तर आता ८८ कोटी रुपयांचा घाट घातला आहे. हा निधी पुणेकरांसाठी नसून ठेकदारांसाठी आहे. फुटपाथचा वापर नागरिक किती करतात आणि व्यावसायिक किती करतात याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. जर इतका निधी खर्च केला जात असेल तर त्याचा फायदा व्यावसायिकांना न होता नागिकांनांच झाला पाहिजे." - उज्ज्वल केसकर, नेते, भाजप

Share