Pune News : पेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाला ९.८ लाखांचा गंडा
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पेन्शन कार्ड काढून देण्याचे आमिष दाखवून बँकेतून बोलत असल्याचे भासवणाऱ्या अज्ञात व्यक्तीने उंड्री येथील ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ९ लाख ८० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
1 min read

Pune News : बँकेतून बोलत असल्याचे सांगून विश्वास संपादन; मोबाईल आणि लिंकद्वारे ऑनलाइन फसवणूक
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पेन्शन कार्ड काढून देण्याचे आमिष दाखवून बँकेतून बोलत असल्याचे भासवणाऱ्या अज्ञात व्यक्तीने उंड्री येथील ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ९ लाख ८० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारक आणि लिंक वापरणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(क) आणि ६६(ड) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाचीवाडी रोड, उंड्री येथे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला ५ ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत एका अज्ञात मोबाईलधारकाने फोन केला. आपण बँकेतून बोलत असल्याचे सांगून पेन्शन कार्ड काढून देण्याचे आश्वासन त्याने दिले. या माध्यमातून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांची ९ लाख ८० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अण्णासो बाबर करीत आहेत.


