Skip to content

Pune News : ६९ वर्षीय महिलेची २.१० लाखांची सोन्याची बांगडी लांबवली

Pune News : पुणे: पुणे-सातारा रस्त्यावरील पंचमी हॉटेलसमोरील बीआरटी बसस्टॉपवर बसमधून उतरत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका अनोळखी चोरट्याने ६९ वर्षीय वृद्ध महिलेच्या हातातील २ लाख १० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरून नेली.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

६९ वर्षीय महिलेची २.१० लाखांची सोन्याची बांगडी लांबवली पर्वती बसस्टॉपवर एसटीतून उतरताना घडला प्रकार
६९ वर्षीय महिलेची २.१० लाखांची सोन्याची बांगडी लांबवली पर्वती बसस्टॉपवर एसटीतून उतरताना घडला प्रकार

Pune News : पर्वती बसस्टॉपवर एसटीतून उतरताना घडला प्रकार

Pune News : पुणे: पुणे-सातारा रस्त्यावरील पंचमी हॉटेलसमोरील बीआरटी बसस्टॉपवर बसमधून उतरत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका अनोळखी चोरट्याने ६९ वर्षीय वृद्ध महिलेच्या हातातील २ लाख १० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडली.

या प्रकरणी कात्रज परिसरात राहणाऱ्या ६९ वर्षीय वृद्ध महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडित महिला या बीआरटी बसने प्रवास करत पर्वती येथील पंचमी हॉटेल बसस्टॉपवर उतरत होत्या. त्यावेळी बसच्या दाराशी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

या गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने वृद्धेच्या हातातील २ लाख १० हजार रुपयांची सोन्याची बांगडी शिताफीने कापून अथवा काढून घेतली. महिला बसमधून खाली उतरल्यानंतर त्यांना बांगडी चोरीला गेल्याचे समजले. पर्वती पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक शंभो पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share