Pune News : देव-देवतांच्या मूर्ती व धार्मिक साहित्याचे विधिवत संकलन
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पूजेत वापरात नसलेल्या, भंगलेल्या किंवा जुन्या देव-देवतांच्या तसेच राष्ट्रपुरुषांच्या आणि पूर्वजांच्या मूर्ती व धार्मिक साहित्याची सन्मानपूर्वक विल्हेवाट लावण्यासाठी ‘विधिवत’च्या वतीने विशेष संकलन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
1 min read

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : पूजेत वापरात नसलेल्या, भंगलेल्या किंवा जुन्या देव-देवतांच्या तसेच राष्ट्रपुरुषांच्या आणि पूर्वजांच्या मूर्ती व धार्मिक साहित्याची सन्मानपूर्वक विल्हेवाट लावण्यासाठी ‘विधिवत’च्या वतीने विशेष संकलन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.https://www.youtube.com/shorts/PXap4Prq8M0 Pune News
या उपक्रमांतर्गत प्लॅस्टर ऑफ पॅरिस व फायबरच्या मूर्ती वगळता देवी-देवतांच्या, राष्ट्रपुरुषांच्या आणि पूर्वजांच्या मूर्ती किंवा फ्रेम्स, धार्मिक पुस्तके, देवाची वस्त्रे, रुद्राक्ष, शाळीग्राम, शंख, कवड्या, माळा, गंगाजल, देव्हारे आदी धार्मिक साहित्य स्वीकारले जाणार आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
हे संकलन शनिवारी, (दि.३) सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत त्वष्टा कासार समाज संस्था, गणेश मंदिर, २४७, कसबा पेठ, तांबट हौद, पुणे येथे करण्यात येणार आहे.
संकलनासाठी पहिल्या एक किलोपर्यंत किमान २०० रुपये शुल्क आकारण्यात येणार असून, त्यापुढील प्रत्येक १०० ग्रॅमसाठी २५ रुपये शुल्क राहणार आहे. शुल्क रोख किंवा यूपीआयद्वारे स्वीकारले जाणार आहे.
संकलित करण्यात आलेल्या सर्व मूर्ती व फ्रेम्सची गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली विधिवत उत्तरपूजा करण्यात येईल. त्यानंतरच संबंधित साहित्य पुनर्निर्माण (Recycling) किंवा पुनर्वापरासाठी पाठवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. या उपक्रमाचा लाभ नागरिकांनी जास्तीत जास्त घ्यावा.


