PUNE NEWS : सीजेपीच्या आंदोलनाला विद्यापीठाची अटींसह परवानगी
पक्षाने आंदोलनासाठी विद्यापीठाकडे अधिकृत परवानगी मागितली होती
1 min read

पक्षाने आंदोलनासाठी विद्यापीठाकडे अधिकृत परवानगी मागितली होती
पुणे PUNE NEWS: नीट-युजी २०२६ आणि विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकारांविरोधात ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) यांनी उद्या (११ जून) आयोजित केलेल्या आंदोलनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने अटींसह परवानगी दिली आहे.

पक्षाने आंदोलनासाठी विद्यापीठाकडे अधिकृत परवानगी मागितली होती. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच विद्यापीठ परिसरातील शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक अटी व नियम घालून ही परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.PUNE NEWS
सीजेपीकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत असून, 'नीट' परीक्षेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून ते पूर्णपणे शांततापूर्ण पद्धतीने करण्यात येईल, असा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.PUNE NEWS
दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलिसांकडूनही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार आहे. आंदोलनाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येण्याची शक्यता असून, विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या अटींचे पालन करण्याचे आवाहन आयोजकांना करण्यात आले आहे.PUNE NEWS
विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, या आंदोलनाकडे शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
PUNE NEWS


