Skip to content

Pune News : 'स्मार्ट सिटी' पुण्याच्या वेशीवर चिमुकल्यांचा जीवघेणा प्रवास

Pune news : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात 'स्मार्ट सिटी'चा दावा करणाऱ्या प्रशासनाचा कारभार किती बोजवारा उडाला आहे, याचे विदारक चित्र महम्मदवाडीतील कृष्णानगर भागात पाहायला मिळत आहे.

DO
Dhanshree Otari

1 min read

Pune News

Pune News : महम्मदवाडीत शाळकरी मुलांची चिखलातून पायपीट

Pune news : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात 'स्मार्ट सिटी'चा दावा करणाऱ्या प्रशासनाचा कारभार किती बोजवारा उडाला आहे, याचे विदारक चित्र महम्मदवाडीतील कृष्णानगर भागात पाहायला मिळत आहे. 'अ‍ॅबंडंट लाईफ स्कूल'मध्ये शिक्षण घेणाऱ्या शेकडो चिमुकल्यांना दररोज जीवघेण्या चिखलातून आणि पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत आहे. २१ व्या शतकातील पुण्यात ही दुरावस्था पालकांमध्ये प्रचंड संताप निर्माण करणारी आहे. ( Pune news student muddy road mohammadwadi)

महम्मदवाडीतील चर्च रोडजवळील सर्व्हे क्रमांक ४०/२, कृष्णानगर हा भाग सध्या विद्यार्थ्यांसह पालकांना मोठ्या समस्येला दररोज सामोरं जावं लागत आहे. गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर कमी झाला असला तरी, या रस्त्याची अवस्था सुधारण्याऐवजी ती अधिकच बिकट झाली आहे. रस्त्यावर साचलेले पाणी आणि चिखलाचे साम्राज्य यामुळे हा रस्ता चालण्यायोग्य राहिलेला नाही. शाळेची बॅग पाठीवर घेऊन, घसरणाऱ्या पायांना सावरत हे विद्यार्थी दररोज शाळेत ये जा करत आहेत. Pune News

PMC WATER NEWS : पुण्यातील काही भागात गुरूवारी पाणी पुरवठा बंद

याबाबत बोलताना अ‍ॅबंडंट लाईफ स्कूलमध्ये शिकणारी नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीचा एक व्हिडीओ समोर आला आहेत. त्यामध्ये ती, "आम्हाला दररोज शाळेत जाण्यासाठी याच चिखलातून चालावे लागते. अनेकदा चालताना आम्ही घसरतो, ज्यामुळे आमचे कपडे आणि बूट खराब होतात. पाऊस असो वा नसो, रस्ता नेहमीच चिखलाने भरलेला असतो. शाळेत येताना आम्हाला भीती वाटते, विशेषतः पावसाच्या दिवसांत हा प्रवास अधिकच कठीण होतो." Pune News

Vertillas: खराडीच्या ‘व्हर्टिलाज’ प्रकल्पाच्या विकासकांविरुद्ध रिकव्हरी वॉरंट जारी

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत पुणे महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जातात, परंतु प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे. हा रस्ता केवळ शाळकरी मुलांसाठीच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिक, पादचारी आणि दुचाकीस्वारांसाठीही जीवघेणा ठरत आहे. चिखलामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

https://www.instagram.com/reel/DbA4ES7tny5/?igsh=MTZqcTRlNzI4Nnlsbw%3D%3D

Share