PUNE NEWS : तांदळी शिवारात आढळला मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा
पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS : शेतशिवारात रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य खाद्यपदार्थ अज्ञात व्यक्तीने फेकून दिल्याची घटना शिरूर तालुक्यातील तांदळी परिसरात घडली आहे.
1 min read

पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: शेतशिवारात रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य खाद्यपदार्थ अज्ञात व्यक्तीने फेकून दिल्याची घटना शिरूर तालुक्यातील तांदळी परिसरात घडली आहे. याप्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.PUNE NEWS

राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुदतबाह्य आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांविरोधात धडक कारवाई सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर हा साठा शेतशिवारात टाकण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, हा साठा नेमका कोणी आणि कुठून आणून फेकला, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.PUNE NEWS
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी या ढिगाऱ्यातील काही खाद्यपदार्थ उचलून नेल्याची बाबही समोर आली आहे. मुदतबाह्य खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे हा प्रकार अत्यंत चिंताजनक मानला जात आहे.PUNE NEWS
या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागाने संपूर्ण साठा जप्त करून सुरक्षितरीत्या नष्ट करावा, तसेच हा साठा फेकणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक गोरक्ष गदाडे यांनी केली आहे.PUNE NEWS
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, अशा प्रकारे मुदतबाह्य खाद्यपदार्थांची उघड्यावर विल्हेवाट लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
PUNE NEWS


