PUNE NEWS : रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणास वेग
१०० मिळकतींचा ताबा झाला पूर्ण
1 min read

१०० मिळकतींचा ताबा झाला पूर्ण
निलेश राऊत
पुणे: कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला वेग आला असून, मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या ५० मीटर रुंदीकरणासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. जागा मालकांनी ताबा दिलेल्या मिळकर्तीवरील आरसीसी पक्की बांधकामे, पत्र्याच्या शेड्स तसेच अन्य आस्थापनांचे निष्कासन पोकलेन, जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने करण्यात येत आहे.PUNE NEWS

कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या १०९ मिळकतींपैकी जवळपास १०० मिळकतींची ताबा पावती पूर्ण झाली असून, उर्वरित ९ मिळकतींबाबतही प्रशासनाकडून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भूसंपादन विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि पथ विभाग यांच्या संयुक्त कारवाईमुळे प्रत्यक्ष कामाला गती मिळाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.PUNE NEWS
नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
शिवशंभोनगर व गोकुळनगर भागातील ताब्यात आलेल्या मिळकती निष्कासित करण्यात आल्या. दरम्यान, अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भूसंपादन व मालमत्ता विभागाच्या सूचनेनुसार ज्या मिळकती पालिकेच्या ताब्यात आल्या आहेत, त्यावरील बांधकामे, आस्थापना निष्कासित करण्यात आल्या. त्यामुळे आता पथ विभागाला रुंदीकरणाचे काम सुरू करता येईल. अशी माहिती अतिक्रमण विभाग उपायुक्त रमेश शेलार यांनी दिली.
PUNE NEWS


