Skip to content

PUNE NEWS : पुणे विधान परिषद निवडणुक बिनविरोध; विक्रम काकडे विजयाच्या दिशेने

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) उमेदवाराची माघार; सुनील टिंगरे व प्रदीप कंद यांनीही घेतली माघार

PG
Prashik Ghaste

1 min read

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) उमेदवाराची माघार; सुनील टिंगरे व प्रदीप कंद यांनीही घेतली माघार

निलेश राऊत
पुणे: पुणे विभाग विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार होऊ नये, लोकशाही मूल्यांचे रक्षण व्हावे आणि निवडणूक प्रक्रियेची पवित्रता अबाधित राहावी या व्यापक भूमिकेतून पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.PUNE NEWS

राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा अजित पवार यांच्या विनंतीला मान देत आणि शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही या निवडणुकीतून माघार घेत आहोत. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), पुणे चे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी सांगितले.PUNE NEWS

दरम्यान, माजी आमदार सुनील टिंगरे व भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी ही आज निवडणुकीतुन माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( अजित पवार गट) उमेदवार विक्रम काकडे यांचा विजय निश्चित झाला आहे.

PUNE NEWS

Share