PUNE NEWS : बीएमसीसी रस्त्यावरील पालिकानिर्मित खड्डे तातडीने भरावेत
मनसे नेते सुहास निम्हण यांची मागणी; काम तातडीने न झाल्यास आंदोलन करणार
1 min read

मनसे नेते सुहास निम्हण यांची मागणी; काम तातडीने न झाल्यास आंदोलन करणार
निलेश राऊत
पुणे PUNE NEWS : गोपाळ गणेश आगरकर मार्ग म्हणजेच बी.एम.सी.सी रस्ता या मार्गावर महात्मा फुले महाविद्यालय, दादासाहेब दरोडे सभागृह, व चंद्रकांत दरोडे विद्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या चौकात पालिकेच्या ठेकेदाराकडून गेले अनेक दिवसापूर्वी काम करतेवेळी रस्ता उकरण्यात आला आहे. यामुळे येथे मोठे खड्डे पडले असून, यामुळे येथे वारंवार अपघात होत आहेत.PUNE NEWS

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून मागील दोन दिवसांच्या पावसात या रस्त्यांची दुरवस्था ही येथील नागरिकांना, विद्यार्थ्यांना डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून येथील खड्डे बुजवावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे छ. शिवाजीनगर/कोथरूडचे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी महापालिका आयुक्त व घोले रोड क्षेत्रीय कार्यालय उपायुक्त यांच्याकडे केली आहे.PUNE NEWS
रस्ता अत्यंत अरुंद आहे
निम्हण म्हणाले, "याबाबत वारंवार मागणी करूनही अनेक दिवस होऊनही हे खड्डे बुजविण्यातही आले नाही. हा रस्ता अत्यंत अरुंद आहे आणि त्यात ह्या ठिकाणी खोदून ठेवण्यात आले आहे. या रस्त्यावर अनेक शाळा, महाविद्यालय, शासकीय संस्था असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची व विद्यार्थ्यांची नेहमीच वर्दळ असते. शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शाळेत सोडायला येणारे पालक, व्हॅन चालक, रिक्षा चालकांना व स्थानिक रहिवाश्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.PUNE NEWS
आंदोलनाचा इशारा
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सदरचा खड्डा दिसत नसल्याने गेल्या २ ते ३ दिवसात या ठिकाणी अनेक वेळा छोटे मोठे अपघात झाले आहेत. या प्रकाराला कंटाळून येथील विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, स्थानिक रहिवासी, व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची वाट न पाहता येत्या २ दिवसात खड्ड्याची पाहणी करून सदरचे खड्डे बुजवावेत. जर येत्या २ दिवसात खड्ड्यांची दुरुस्ती झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा निम्हण यांनी दिला आहे.
PUNE NEWS


