PUNE NEWS : कुदळवाडीत अतिक्रमण कारवाईदरम्यान पोलिसांवर दगडफेक; ३६ जणांना अटक
तणावपूर्ण वातावरण; ३०० ते ५०० नागरिकांनी केली दगडफेक; १० ते १५ पोलिस जखमी
3 min read

तणावपूर्ण वातावरण; ३०० ते ५०० नागरिकांनी केली दगडफेक; १० ते १५ पोलिस जखमी
शहरातील अनधिकृत बांधकामांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे हे शहरातील नियोजित व शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना प्रशासनाकडून अभय दिले जाणार नाही. शहरातील पायाभूत सुविधा, सुरक्षितता आणि कायद्याचे पालन अबाधित राखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सातत्याने राबविण्यात येतील. नागरिकांनीही बांधकाम करण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या घेऊनच पुढील कार्यवाही करावी. - डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पुणे PUNE NEWS : चिखली कुदळवाडीतील धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण कारवाई दरम्यान एका समाजाच्या ३०० ते ५०० नागरिकांनी एकत्र येऊन पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. या दगडफेकीत १० ते १५ पोलिस कर्मचारी जखमी झाले असून पोलिस वाहनांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने गर्दी पांगविल्याने मोठा अनर्थ टळला. मंगळवारी (९ जून) रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली.PUNE NEWS

पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांवर आता कायद्याचा बडगा उगारण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ३६ जणांना अटक करण्यात आली असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज, ड्रोन व्हिडिओ आणि पोलिसांच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या संशयितांची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत.PUNE NEWS
कुदळवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अतिक्रमण कारवाई सुरू आहे. गेल्या वर्षी या परिसरातील सुमारे १००० एकर पेक्षा जास्त जमिनीवरील अतिक्रमणे आणि अवैध बांधकामे पिंपरी चिंचवड महापालिकेने जमीनदोस्त केली होती. त्यानंतर, या परिसरातील अनधिकृत धार्मिकस्थळांकडे महापालिकेने मोर्चा वळविला होता.
याआधी सोमवारी रात्री झाली होती अतिक्रमण कारवाई
यापूर्वी चार धार्मिक स्थळांवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली होती. त्याचप्रमाणे मंगळवारी ११ संमिश्र धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे नियोजन होते. त्यातही महापालिका आणि पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. सोमवारी रात्री एक वाजता अतिक्रमण कारवाईसाठी महापालिकेचे पथक आणि बंदोबस्थातील पोलिस कुदळवाडीत दाखल झाले. दरम्यान, या वेळेतच आसपासच्या गल्लीबोळातून १५ ते २५ वयोगटातील तरुण मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले.PUNE NEWS
पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक
मात्र, कोणत्याही संघटनेचे पत्र किंवा नेता पोलिसांना भेटला नव्हता. अतिक्रमण कारवाईला कोणी विरोधही दाखविला नव्हता. त्यामुळे ही गर्दी नेमकी कोणती आहे, एवढ्या रात्री तरुण रस्त्यावर का उतरले आहेत, हे पोलिसांच्या लक्षात आले नाही. अतिक्रमण कारवाई सुरू होताच यातील काही तरुणांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर सर्व गर्दीने पोलिसांवर दगडफेक केली. यात काही पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर, गर्दीने पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करत वाहनाचे मोठे नुकसान केले. परस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच पोलिसांनी आपल्या पद्धतीने गर्दी पांगविण्यास सुरुवात केली. पोलिसांनी बळाचा वापर करताच काही वेळात गर्दी पांगली. त्यांनंतर अतिक्रमण कारवाई पूर्ण करण्यात आली.
पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत दगडफेकीत सहभागी असलेल्या संशयितांची धरपकड सुरू केली आहे. अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फुटेजच्या आधारे प्रत्येक आरोपीची ओळख पटवली जात असून दगडफेकीत सहभागी असलेल्या एकाही व्यक्तीला सोडले जाणार नाही. त्यामुळे चिखली दगडफेक प्रकरणात अटकसत्र सुरु राहण्याची शक्यता आहे. "पोलिसांवर हात उचलणाऱ्यांना कायद्याची ताकद दाखवली जाईल," असा स्पष्ट इशाराच पोलिसांनी दिला आहे.PUNE NEWS
११ धार्मिक स्थळांवर कारवाई
पिंपरी चिंचवड महापालिकेने चिखली, कुदळवाडी आणि पवारवस्ती परिसरातील ११ धार्मिक स्थळांवर कारवाई केली. यामध्ये २८ हजार १ चौरसफूट क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. दरम्यान, महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाचे १२ कार्यकारी अभियंता, ३२ उप अभियंता, १८ कनिष्ठ अभियंता आणि ४२ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक) सहभागी झाले होते. तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी देखील सहभागी झाले होते.PUNE NEWS
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
अतिक्रमण कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी आणि जवळपास १५० एम.एस.एफ जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच २२ पोकलेन, २६ जेसीबी आणि १२० मजुरांच्या सहाय्याने ही बांधकामे हटवण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी ४ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
PUNE NEWS


