Skip to content

Pune News: पदोन्नतीनेच होणार रिक्त पदांची भरती; पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर

पुणे,(Pune News) महाराष्ट्र मिरर : पुणे महापालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरताना प्रथम महापालिकेतील (PMC) विद्यमान कर्मचाऱ्यांना ज्या पदांवर पदोन्नतीची संधी उपलब्ध आहे, त्या पदांवर प्राधान्याने पदोन्नती प्रक्रिया राबवावी.

DO
Dhanshree Otari

2 min read

Pune News: पदोन्नतीनेच होणार रिक्त पदांची भरती; पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर

पुणे,(Pune News) महाराष्ट्र मिरर : पुणे महापालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरताना प्रथम महापालिकेतील (PMC) विद्यमान कर्मचाऱ्यांना ज्या पदांवर पदोन्नतीची संधी उपलब्ध आहे, त्या पदांवर प्राधान्याने पदोन्नती प्रक्रिया राबवावी. त्यानंतर उर्वरित रिक्त पदांसाठीच सरळसेवा भरती घ्यावी, याबाबतची उपसूचना देऊन सदरची रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.(pune news pmc recruitment promotion first general body approval)

सर्व साधारण सभेच्या या मान्यतेमुळे आता महापालिकेतील (Pune News)तेरा अत्यावश्यक पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या मंजुरीपूर्वी महापालिकेचे सुधारित भरती नियम अद्याप जाहीर का झाले नाहीत आणि संगणकीकृत परीक्षा घेण्यासाठी केवळ आयबीपीएस या संस्थेलाच प्राधान्य का दिले जात आहे, या मुद्द्यावरून सभागृहात प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली.

हेही वाचा: Medha Kulkarni Vat Purnima Controversy: खासदार मेधा कुलकर्णींच्या वटपूजेवरून पुण्यात राजकीय वातावरण तापले!

काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे यांना विरोधकांच्या रोखठोक प्रश्नांना सामोरे जावे लागले. अखेर, सामान्य प्रशासन विभागाचे माजी उपायुक्त विजयकुमार थोरात यांनी मध्यस्थी करत पुढील सर्वसाधारण सभेत भरती नियमांमधील त्रुटी दूर करून सुधारित नियम सादर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चर्चेला विराम मिळाला. त्यानंतर विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम यांच्या उपसूचनेसह भरती प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

CRIME NEWS: हवालदाराची भाईगिरी! एपीआयला ठाण्यातच मारहाण; महिला पोलिसांबरोबर गैर वर्तनामुळे निलंबन

महापालिकेच्या विविध विभागांतील अत्यावश्यक रिक्त पदे भरण्यासाठी आयबीपीएस या संस्थेमार्फत परीक्षा घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सभागृहासमोर ठेवला होता. प्रस्तावावर चर्चा सुरू होताच अरविंद शिंदे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. महापालिकेचे नवीन भरती नियम कधी जाहीर होणार? भरती प्रक्रिया राबविताना आयबीपीएस आणि टीसीएस या दोन्ही संस्थांचा पर्याय उपलब्ध असताना केवळ एका संस्थेलाच संधी का दिली जात आहे? याबाबत शासनाचा कोणता निर्णय आहे का असा सवाल त्यांनी केला.

यावर उपायुक्त किशोरी शिंदे यांनी परीक्षा घेण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार असल्याचे सांगितले. तसेच यापूर्वीच्या तीन परीक्षा आयबीपीएसमार्फत घेण्यात आल्याने त्याच संस्थेला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट केले. मात्र, टीसीएसला डावलण्याचे नेमके कारण काय, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर प्रशासनाकडून मिळाले नाही.

दरम्यान, एखाद्या संस्थेला प्राधान्य देताना त्यामागील स्पष्ट कारण सभागृहाला सांगितले पाहिजे. केवळ यापूर्वी परीक्षा घेतली म्हणून त्याच संस्थेला पुन्हा संधी देणे योग्य नाही, अशी भूमिका अरविंद शिंदे यांनी मांडली. याचवेळी महापालिकेचे भरती नियम अद्याप अंतिम झाले नसल्याचा मुद्दाही चर्चेत आला. आरआरमध्ये अस…

या पदांची भरती होणार

वर्ग-१ पदे :

त्वचारोग तज्ज्ञ, एड्स मॉडेल अधिकारी,
न्यूरोसर्जन,युरोसर्जन,
रक्तसंक्रमण अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी,

वर्ग-२ पदे :

भूलतज्ज्ञ (ॲनेस्थेटिस्ट), जीवशास्त्रज्ञ,

विभागीय अग्निशमन अधिकारी, सहायक विभागीय अधिकारी, राजशिष्टाचार अधिकारी / उपनगरसचिव

वर्ग-३ पदे :

सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, मत्स्यालय पर्यवेक्षक / सहाय्यक

आरआर म्हणजेच आकृतीबंध

महापालिकेतील कोणते पद कोणत्या शैक्षणिक पात्रतेच्या व्यक्तीने भरायचे, पदोन्नतीची प्रक्रिया काय असणार, सेवाज्येष्ठता आणि भरतीची पद्धत कशी असेल, यासाठी तयार करण्यात येणाऱ्या नियमांना भरती नियम (आरआर) असे म्हटले जाते. यास आकृती बंध म्हटले जाते. हे नियम अंतिम नसतील तर नवीन भरती प्रक्रियेत कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आरआर लवकर अंतिम करण्याची मागणी सभासदांकडून करण्यात आली आहे.

Share