Pune News ; टाळ-मृदंगाच्या गजरात, ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषातदोन्ही पालख्यांचे गुरुवारी दुपारी पुण्यनगरीत आगमन
पहाटे पासूनच धो धो कोसळणाऱ्या पावसाची पूर्ण उघडीप : वारकऱ्यांचा व भाविकांचा आनंद द्विगुणीत इंद्रायणीला आलेल्या पुरामुळे पुण्यात थांबलेल्या दिंड्या पालखी सोहळ्यात सामील होताच लोटला वारकऱ्यांचा जनसागर फुलांच्या वर्षावात व रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो पुणेकरांच्या स्वागतानंतर पालख्या रात्री
2 min read

निलेश राऊत
महाराष्ट्र मिरर
पुणे, ९ जुलै : pune news ; अवघाचा संसार सुखाचा करीन ! आनंदे भरीन तिन्ही लोक !! जाईन गे माये तया पंढरपुरा ! भेटेन माहेर आपुलिया !! या ओढीने पंढरपूर कडे विठ्ठल दर्शनासाठी लाखो वारकऱ्यांसह निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या व आकर्षक पुष्प सजावट केलेल्या पालख्या गुरुवारी दुपारी पुणे शहरात एका पाठोपाठ दाखल झाल्या.

आज पहाटे पासूनच धो धो कोसळणाऱ्या पावसाची पूर्ण उघडीप दिल्याने पुण्यात थांबलेल्या अनेक दिंड्या या आळंदीच्या दिशेने मार्गस्थ होऊन पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या. तर या दोन्ही पालख्यांना पुण्यात घेऊन येण्यासाठी व वारीत सहभागी होण्यासाठी असंख्य अबाल वृद्ध व तरुण तरुणी पहाटेच आकुर्डी व चऱ्होली फाट्यावर पालख्यांच्या स्वागतासाठी उभे होते.
श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी दुपारी साडे चार च्या सुमारास हॅरिश पूल पार कडून पुणे शहरात दाखल झाली. तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा चऱ्होली फाटा मार्गे चऱ्होली चौक येथून दुपारी 2 वाजता कळस येथे सुमारास दाखल झाला. यावेळी या दोन्ही ठिकाणी महापालिकेच्या वतीने व पुणेकरांच्या वतीने महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम नवं आदी अधिकारी, पदाधिकारी यांनी पालख्यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले.

दोन्ही पालख्यांचे स्वागत करताना भक्तिरसात न्हालेल्या वारीने पुण्यनगरी हरिनामाने दुमदुमली. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पंढरपूर दर्शनाच्या उत्साहाची झलक तर त्यांचे दर्शन झाल्याचा आनंद पुणेकरांच्या चेहऱ्यावर झळकत होता. काही वारकरी टाळ-मृदंग वाजवत, फेर-फुगड्या खेळत, जयघोष करीत आनंदाने नाचत होते.
वारीचा आनंद सोहळा याचि देही, याचि डोळा अनुभवण्यासाठी पुणेकर वारी मार्गावर सकाळपासून आस लावून बसला होता. दुपारच्या वारी पुण्यनगरीत दाखल झाली आणि फुलांच्या वर्षावात सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. प्रत्येक वारकरी समाधानी आणि आनंदी दिसत होता. तयातच गेल्या आठ दिवसांपासून वरुणराजाने चांगलीच कृपा दाखवून बुधवारपासून वारी मार्गस्थ होण्यापूर्वी व आज उघडीप दिल्याने वारकऱ्यांचा व भाविकांचा आनंद द्विगुणीत झाला होता.

शिस्तबद्ध पद्धतीने एकामागोमाग चालणाऱ्या दिंड्या,
हातात भगवी पताका, महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर असलेली तुळशीवृंदावन, टाळ-मृदंगाच्या तालावर फेर धरणारे व आणि फुगड्या कखेळणारे वारकरी, जागोजागी पुणेकरांकडून, विविध संस्था यांच्याकडून ध्वनी वर्धकवरून भक्ती गीतांच्या गजरात व पुष्पवृष्टी करून होणारे स्वागत यामुळे शहर भक्तिरसात नाहून निघाले.
वारीचा हा आनंद सोहळा आता पुण्यात मुक्कामी असणार आहे. त्यामुळे पुणेकर वारकऱ्यांची सेवा करण्यात दंग राहतील. पुण्यात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी उद्या मुक्कामी राहणार असून,नागरिकांना पालखीचे दर्शन घेण्यासाठी पूर्ण एक दिवस दरवर्षीप्रमाणे मिळणार आहे. शनिवारी सकाळी माऊली सासवडच्या दिशेने तर संत तुकाराम लोणी काळभोरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत.
Pune News


