PUNE NEWS : … तर कृत्रिम पावसाचा विचार आला नसता!
महाराष्ट्र मिरर, पुणे, PUNE NEWS : पुणे महापालिका कृत्रिम पाऊस पाडण्याचा शक्यतेचा अभ्यास करणार आहे.
1 min read

महाराष्ट्र मिरर, पुणे, PUNE NEWS: पुणे महापालिका कृत्रिम पाऊस पाडण्याचा शक्यतेचा अभ्यास करणार आहे. पण योग्य वेळी लक्ष दिले असते तर कृत्रिम पाऊस चा विचार आला नसता असे मत महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी व्यक्त केले.PUNE NEWS

उज्ज्वल केसकर म्हणाले, पुण्याची पाणीटंचाई ही मानवनिर्मित आहे, हे यापूर्वी आम्ही स्पष्ट केले आहे. कालवा समितीच्या बैठकीमध्ये शहरातील नेत्यांनी योग्य लक्ष दिले असते तर शेतीसाठीचे आवर्तन थांबले असते आणि माणसांना पाणी मिळाले असते.PUNE NEWS
ज्या भागामध्ये ऊस महत्त्वाचा आहे, त्या भागातील आमदाराने आपल्या भागात आवर्तनाद्वारे पाणी नेले.
जिथे माणूस महत्त्वाचा आहे तेथील लोकप्रतिनिधींनी माणसांना महत्त्व दिले नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शेती ही जगली पाहिजे, परंतु सगळ्यात महत्त्वाचे माणूस जगला पाहिजे पण त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याबद्दल विचार सुरू झाला. योग्य वेळी योग्य गोष्टींकडे लक्ष दिले, तर अशा गोष्टी कराव्या लागत नाहीत अशी टीकाही त्यांनी केली.
PUNE NEWS


