Skip to content

PUNE NEWS : निलेश नवलखा यांचा मोहोळांवर अप्रत्यक्ष निशाणा?

'पुणे टू दिल्ली जॉईन कॉकरोच प्रोटेस्ट’ दौरा

PG
Prashik Ghaste

1 min read

PUNE NEWS : निलेश नवलखा यांचा मोहोळांवर अप्रत्यक्ष निशाणा?

'पुणे टू दिल्ली जॉईन कॉकरोच प्रोटेस्ट’ दौरा

पुणे PUNE NEWS : “पुणे टू दिल्ली जॉईन कॉकरोच प्रोटेस्ट” या घोषणेसह उद्योजक निलेश नवलखा यांनी दिल्लीकडे रवाना होत काँग्रेसला समर्थन दर्शवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पुण्यातील जमीन वाद, स्थानिक प्रश्न आणि कथित भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून त्यांनी सत्ताधारी नेतृत्वावर टीका केल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, ‘कॉकरोच प्रोटेस्ट’ ही संज्ञा वापरत नवलखा यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक राजकीय व्यवस्थेवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा सुरू आहे. पुण्यातील काही वादग्रस्त जमीन व्यवहार, नागरिकांच्या तक्रारी आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करण्याची तयारी केल्याचे समजते.PUNE NEWS

राजकीय स्टंट की पुण्याचा आवाज राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न?
नवलखा समर्थकांच्या मते, हा आंदोलनात्मक दौरा पुण्यातील नागरिकांच्या आवाजाला राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. तर भाजप समर्थकांकडून याकडे केवळ राजकीय स्टंट म्हणून पाहिले जात आहे.PUNE NEWS

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवलखा यांची ही भूमिका आणि दिल्ली दौरा पुण्यातील राजकीय वातावरण तापवणारा ठरू शकतो. ‘पुणे टू दिल्ली कॉकरोच प्रोटेस्ट’ नेमका कोणत्या मागण्यांसाठी आणि कोणाविरोधात आहे, याबाबत आता अधिकृत भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

PUNE NEWS

Share