Skip to content

PUNE NEWS : पिंपरीच्या निधी अग्रवालची आकाशाला गवसणी

भारतीय वायुसेनेत फ्लाइंग ऑफिसर म्हणून नियुक्ती

PG
Prashik Ghaste

2 min read

PUNE NEWS : पिंपरीच्या निधी अग्रवालची आकाशाला गवसणी

भारतीय वायुसेनेत फ्लाइंग ऑफिसर म्हणून नियुक्ती

पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: दहावीत असताना मित्र-मैत्रिणींनी ‘मोठेपणी काय बनणार?’ असा प्रश्न विचारल्यावर आकाशातून जाणाऱ्या विमानाकडे पाहत ‘मी पायलट बनणार’ असे उत्तर देणाऱ्या पिंपरीतील निधी सुधीर अग्रवाल हिने अखेर आपले स्वप्न सत्यात उतरवले आहे. तिची भारतीय वायुसेनेत फ्लाइंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आहे. यामुळे पिंपरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.PUNE NEWS

हैदराबाद येथील डुंडीगलमधील एअर फोर्स अकादमीत १३ जून रोजी झालेल्या समारंभात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांच्या उपस्थितीत निधीने फ्लाइंग ऑफिसर पदाची जबाबदारी स्वीकारली.PUNE NEWS

पिंपरीतील मासुळकर कॉलनी परिसरातील महिंद्रा रॉयल सोसायटीत निधी राहते. तिचे शालेय शिक्षण अजमेरा इंग्लिश स्कूलमध्ये झाले. दहावीत तिने ९३ टक्के गुण मिळवले. त्यानंतर पिंपरीतील जय हिंद महाविद्यालयातून बारावी शिक्षण पूर्ण करून आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयातून संगणक अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. शिक्षणानंतर कॅम्पस इंटरव्ह्यूमधून तिची एका बहुराष्ट्रीय कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून निवड झाली होती. मात्र, देशसेवेची ओढ आणि सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न तिच्या मनात कायम होते.PUNE NEWS


नोकरी करत असतानाच तिने सैन्यदलाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली. तिच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले आणि तिने तिन्ही सैन्यदलांच्या निवड प्रक्रियेत यश संपादन केले. देशसेवेसाठी तिने आकर्षक पगाराची नोकरी सोडत मार्च २०२४ मध्ये भारतीय नौदलात सब-लेफ्टनंट म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत भारतीय वायुसेनेत वैमानिक पदासाठी तिची निवड झाली. त्यामुळे नौदलाचा राजीनामा देऊन ती १ जानेवारी २०२५ रोजी वायुसेनेच्या प्रशिक्षणासाठी दाखल झाली.
कठोर प्रशिक्षण, शिस्तबद्ध जीवनशैली, मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर निधीने वैमानिक प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. अखेर फ्लाइंग ऑफिसर म्हणून नियुक्ती मिळवत तिने आपल्या बालपणीच्या स्वप्नाला पंख दिले.

निधीच्या यशात तिची आई निरुपमा अग्रवाल, वडील सुधीर अग्रवाल यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच कर्नल संदीप चेट्टी, माजी कमोडोर योगेश चौधरी आणि कर्नल खांडेकर यांनी तिला वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच, तिच्या या यशाबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.PUNE NEWS

“निधी आमची धाकटी मुलगी असून तिने आमच्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण केले आहे. तिच्या या यशामुळे कुटुंबासह समाज आणि देशाचा गौरव वाढला आहे. तिचा आम्हाला अभिमान आहे.”
सुधीर अग्रवाल

PUNE NEWS

Share