Skip to content

PUNE NEWS संगमवाडी गावाला जोडणारा नवा रस्ता लवकरच

पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS : येरवडा आणि पुणे शहराला संगमवाडी गावाशी जोडणाऱ्या प्रस्तावित नव्या रस्त्याच्या जागेची पाहणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते ॲड.

VZ
Vidula Zagade

1 min read

PUNE NEWS संगमवाडी गावाला जोडणारा नवा रस्ता लवकरच

विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम यांची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी

पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS : येरवडा आणि पुणे शहराला संगमवाडी गावाशी जोडणाऱ्या प्रस्तावित नव्या रस्त्याच्या जागेची पाहणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. या रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. PUNE NEWS

डेक्कन कॉलेज ते संगमवाडी हा जुना रस्ता वाहतूक कोंडीमुळे पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून मागील काही वर्षांपूर्वी तात्पुरता बंद करण्यात आला होता. त्यानंतर सैन्य दलाच्या बॉम्बे इंजीनिअरिंग ग्रुपकडून (बीईजी) सदर रस्त्यावर दोन्ही बाजूला फाटक (गेट) लावून, हा रस्ता सामान्य वाहतूक आणि वर्दळीसाठी बंद करण्यात आला. याविरोधात संगमवाडीतील नागरिकांनी विरोध दर्शवत आंदोलनेही केली.

या रस्त्यावर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून बीईजीकडून फलक लावण्यात आले. यामुळे संगमवाडीतील नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. येथील नागरिकांची प्राथमिक गरज व महत्त्वाची अडचण लक्षात घेत विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम यांनी संगमवाडी गाव ते मुळा-मुठा नदी काठावरील रस्त्याला जोडणारा नवीन स्वतंत्र रस्ता करण्याबाबत, महापालिकेकडे प्रस्ताव दाखल केला. याबाबत महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत निकम यांनी सदर प्रस्तावित रस्त्याच्या जागेची आणि आराखड्याची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. PUNE NEWS

या वेळी माजी स्वीकृत सदस्य समीर निकम, समाधान शिंदे, सोमेश्वर बालगुडे, कैलास पवार, गजानन सोरटे, कपिल शिंदे, मिलन बोर्डे, रमेश गव्हाणे उपस्थित होते.

PUNE NEWS

Share