Skip to content

PUNE NEWS : भोर येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम उत्साहात

शहरात अनेक ठिकाणी पोलिओ डोस केंद्रांची उपलब्धता

PG
Prashik Ghaste

1 min read

PUNE NEWS : भोर येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम उत्साहात

शहरात अनेक ठिकाणी पोलिओ डोस केंद्रांची उपलब्धता

पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेनिमित्त रविवारी (२८ जून) भोर शहरात विविध केंद्रांवर पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात आले. पोलिओमुक्त भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.PUNE NEWS

भोर शहरातील चौपाटी हनुमान मंदिर, शिवाजी हायस्कूल, भेलके वाडी विठ्ठल मंदिर, राजवाडा पंचायत समिती, एसटी स्टँड, उपजिल्हा रुग्णालय, संजय नगर गणेश मंदिर, वाघजाई नगर साई मंदिर, नागोबा आळी गणेश मंदिर, भोरेश्वर नगर मारुती मंदिर आणि नगरपालिकेजवळ पोलिओ डोस देण्याची सुविधा उपलब्ध केली गेली.PUNE NEWS

यानिमित्ताने आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला जवळच्या पोलिओ केंद्रावर घेऊन जाऊन पोलिओचा डोस देण्याचे आणि पोलिओमुक्त, निरोगी आणि सुरक्षित भारत घडविण्यासाठी प्रत्येक पालकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने पालकांना करण्यात आले होते.

PUNE NEWS

Share