Skip to content

PUNE NEWS : नसरापूर बलात्कार व खून प्रकरण

दोषी अधमाला 'मरेपर्यंत फाशी'ची शिक्षा; न्यायालयात पालकांना अश्रू अनावर

PG
Prashik Ghaste

3 min read

PUNE NEWS : नसरापूर बलात्कार व खून प्रकरण

दोषी अधमाला 'मरेपर्यंत फाशी'ची शिक्षा; न्यायालयात पालकांना अश्रू अनावर

महत्वाचे मुद्दे
*न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि 'दुर्मीळातील दुर्मीळ' स्वरूपाचा असल्याचे नमूद केले
*उपमुख्यमंत्र्यांनी अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी समाज आणि प्रशासनाने एकत्रितपणे अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे सांगितले

प्रतीक्षा पारखी
पुणे PUNE NEWS:
नसरापूर येथील चिमुकलीवरील बलात्कार व हत्येच्या अत्यंत क्रूर प्रकरणात न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला "मरेपर्यंत फाशी"ची शिक्षा सुनावली. या निकालानंतर न्यायालयात उपस्थित असलेल्या चिमुकलीच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले. न्यायलढ्यानंतर अखेर मुलीला न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.PUNE NEWS

सरकारी पक्षाने न्यायालयात मांडलेल्या पुराव्यानुसार, आरोपीने चिमुकलीवर अत्यंत अमानुष पद्धतीने अत्याचार केले. तिचे हात बांधण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे तपासातून समोर आले. शवविच्छेदन अहवाल आणि न्यायालयीन नोंदींनुसार, आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या तोंडात तिचीच लेगिन्स पँट सुमारे २१ सेंटीमीटर आतपर्यंत कोंबली होती. या भीषण अत्याचारामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती.PUNE NEWS

'अशा गुन्ह्यांना कोणतीही सहानुभूती दाखवता येणार नाही'
न्यायालयाने हा गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि 'दुर्मीळातील दुर्मीळ' स्वरूपाचा असल्याचे नमूद करत आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात अशा गुन्ह्यांना कोणतीही सहानुभूती दाखवता येणार नसल्याचे स्पष्ट केले.PUNE NEWS

मात्र, निकालानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आणि त्यांच्या वकिलांनी भावना व्यक्त करत, "आरोपीला दिलेली शिक्षा देखील अपुरीच आहे. अशा नराधमाला केवळ फाशीची शिक्षा पुरेशी नाही," अशी तीव्र प्रतिक्रिया दिली. न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी मुलीला झालेल्या अमानुष वेदनांची भरपाई कोणतीही शिक्षा करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

निकाल जाहीर होताच न्यायालयातील वातावरण भावनिक झाले. चिमुकलीच्या आई-वडिलांनी एकमेकांना मिठी मारत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सुरू असलेल्या न्यायलढ्याचा शेवट झाला असला, तरी आपल्या मुलीला कायमचे गमावल्याचे दुःख कधीही भरून निघणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.PUNE NEWS

न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा संदेश
या निकालामुळे महिलांवरील आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना कठोर इशारा मिळाला असून, अशा गुन्ह्यांविरोधात न्यायव्यवस्था कठोर भूमिका घेत असल्याचा संदेश समाजात गेला आहे.PUNE NEWS

यावर समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, "आपल्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अत्यंत संवेदनशील चिमुकलीच्या बलात्कार व हत्येच्या प्रकरणात न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे. अशा अमानुष कृत्यांना समाजात कोणतीही जागा नाही. प्रत्येक महिला व मुलीची सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून, अशा गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाईचा निर्धार कायम राहील. न्याय मिळाला, पण अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी समाज आणि प्रशासनाने एकत्रितपणे अधिक सजग राहण्याची गरज आहे. बलात्कार आणि हत्येसारख्या अमानुष गुन्ह्यांना कोणतीही माफी नाही. न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास बळकट करणारा आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपले सरकार कटिबद्ध असून, अशा नराधमीवृत्तीच्या गुन्हेगारांविरोधात कठोरात कठोर कारवाई सुरूच राहील."PUNE NEWS

पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, नसरापूर येथील अत्यंत क्रूर आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या प्रकरणातील नराधम आरोपी भीमराव कांबळे याला अतिशय जलद गतीने फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल माननीय न्यायालयाचे मनःपूर्वक आभार !

"या निर्णयाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, गुन्हा जितका भयावह असेल तितक्याच कठोर आणि वेगवान पद्धतीने न्यायही मिळू शकतो. हा निर्णय केवळ एका आरोपीला झालेली शिक्षा नसून, महिलांवर अत्याचार करणाऱ्या आणि समाजात विकृती पसरवणाऱ्या प्रवृत्तींना दिलेला स्पष्ट इशारा आहे.PUNE NEWS

"या प्रकरणात मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत खटल्याचा वेग वाढविण्यासाठी पुढाकार घेतला. सरकारी पक्षाने प्रभावीपणे बाजू मांडत हा गुन्हा "दुर्मिळातील दुर्मिळ" असल्याचे न्यायालयासमोर सिद्ध केले आणि अल्पावधीत न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली."

PUNE NEWS

Share