PUNE NEWS : महापालिका शहरात नवीन ५० टँकर भरणा केंद्रे उभारणार
पाणीबाणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय
1 min read

पाणीबाणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय
पुणे, निलेश राऊत, PUNE NEWS: शहरातील विहिरीचेही पाणी आटल्यामुळे टँकर मिळण्यास लागणारा वेळ व त्यातच दिवसाआड होणारा महापालिकेचा पाणीपुरवठा आणि टँकरसाठीची वाढती मागणी पाहता महापालिकेने शहरात ५० नवीन टँकर भरणा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रांमधून दररोज ३००हून अधिक अतिरिक्त टँकरच्या फेऱ्या शक्य होणार आहेत.PUNE NEWS

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी याबाबत माहिती दिली. पाऊस लांबल्याने व हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविल्याने महापालिकेने १५ जूनपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा लागू केला आहे. सम-विषम तारखांनुसार पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, ही व्यवस्था अजून स्थिरस्थावर झाली नसल्याने शहरात पाणीबाणीसारखी स्थिती ओढवली आहे. त्यामुळे टँकरची मागणी वाढली आहे. टँकरचालकांनीही दर वाढवले आहे. मात्र, विहिरीचेही पाणी आटल्यामुळे टँकर मिळण्यास वेळ लागत आहे. यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला होता. PUNE NEWS
नागरिकांना वेळेवर पाणी उपलब्ध होण्यास होणार मदत
या पार्श्वभूमीवर महापालिकेने टँकर भरणा केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या केंद्रांमुळे टँकरना पाणी भरण्यासाठी होणारी प्रतीक्षा कमी होईल, पुरवठा अधिक वेगाने होईल आणि खासगी टँकरच्या कृत्रिम दरवाढीलाही आळा बसण्यास मदत होईल.PUNE NEWS
नव्या केंद्रांमधून प्रति तास सहा अतिरिक्त टँकर भरता येतील, तर दिवसभरात ३००हून अधिक वाढीव फेऱ्या होऊ शकतील. त्यामुळे नागरिकांना वेळेवर पाणी उपलब्ध करून देण्यास मोठी मदत होईल, असे जगताप म्हणाले.
PUNE NEWS


