Skip to content

PUNE NEWS : घाटमाथ्यावर मान्सूनने जोर धरला; पुण्यात प्रतिक्षा कायम

पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS : नैऋत्य मोसमी पावसाचे राज्यात आगमन होऊनही पुणे शहरात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

PG
Prashik Ghaste

2 min read

PUNE NEWS : घाटमाथ्यावर मान्सूनने जोर धरला; पुण्यात प्रतिक्षा कायम

पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: नैऋत्य मोसमी पावसाचे राज्यात आगमन होऊनही पुणे शहरात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण आणि तुरळक सरी पडत असल्या तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. मात्र, लगतच्या घाटमाथ्यावर मान्सूनने जोर धरला असून पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे पुनरुज्जीवन होत असल्याचे चित्र आहे.PUNE NEWS

भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) माहितीनुसार, सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत लोणावळ्यात १६० मिमी, डोंगरवाडीत १५८ मिमी आणि ताम्हिणीत १२५ मिमी पावसाची नोंद झाली. त्याउलट, पुणे शहरातील लोहगाव येथे केवळ २ मिमी पाऊस झाला. त्यामुळे शहर आणि घाट परिसरातील पावसातील मोठी तफावत पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.PUNE NEWS

दरम्यान, २९ जून रोजी रायगड जिल्ह्यातील भीरा येथे तब्बल ४३० मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम घाटावर मान्सून सक्रिय होत असल्याचे हे प्रमुख लक्षण मानले जात असून, त्याचा परिणाम पुढील काही दिवसांत पुणे जिल्ह्यावरही होण्याची शक्यता आहे.

यंदा एल निनोचा प्रभाव आणि प्रतिकूल वातावरणीय परिस्थितीमुळे मान्सूनचा प्रवास मंदावला आहे. त्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. नारायणगाव आणि राजगुरुनगरसारखे काही अपवाद वगळता बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे.PUNE NEWS

पुणे शहरात पुढील काही दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि घाट परिसरात जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता असून, त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना आवश्यक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.PUNE NEWS

ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यपी यांच्या मते, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि लगतच्या भागांमध्ये पावसाचा जोर वाढेल आणि हा प्रभाव जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कायम राहू शकतो.PUNE NEWS

अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ

पुणे जिल्ह्यात ४७ टक्के तूट कायम

आयएमडीच्या आकडेवारीनुसार, १ जून ते २९ जून या कालावधीत पुणे जिल्ह्यात सरासरी १,७८४ मिमी पावसाची अपेक्षा असते. मात्र, यंदा या कालावधीत केवळ ९३८ मिमी पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात तब्बल ४७ टक्के पावसाची तूट कायम आहे.

PUNE NEWS

Share