Skip to content

PUNE NEWS : बारामती तालुक्यात अवैद्य हातभट्टी दारूवर मोठी कारवाई

माळेगाव पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त मोहीम; हजारो लिटर कच्चे रसायन आणि साहित्य केले नष्ट

PG
Prashik Ghaste

1 min read

PUNE NEWS : बारामती तालुक्यात अवैद्य हातभट्टी दारूवर मोठी कारवाई

माळेगाव पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त मोहीम; हजारो लिटर कच्चे रसायन आणि साहित्य केले नष्ट

पुणे PUNE NEWS : बारामती तालुक्यातील खांडज या ठिकाणी माळेगाव पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैद्य हातभट्टी दारूवर मोठी कारवाई केली आहे.. रात्री साडे बाराच्या दरम्यान जाऊन अवैद्य हातभट्टी व्यवसायासाठी लागणारे कच्चे रसायन आणि त्याला लागणारे साहित्य दबंग अधिकारी म्हणून ओळख असलेले पोलीस अधिकारी निलेश माने यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या आदेशानुसार नष्ट केले आहे.

सातत्याने होत असलेल्या कारवाईमुळे बारामती तालुक्यातील अवैद्य हातभट्टी व्यवसाय करणारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.PUNE NEWS :

PUNE NEWS :

Share