PUNE NEWS: विधानपरिषद निवडणुकीवर आयकरची नजर
पैशांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी नियंत्रण कक्ष
1 min read

पैशांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी नियंत्रण कक्ष
निलेश राऊत
पुणे: विधानपरिषदे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, या निवडणुकीवर आयकर विभागाने करडी नजर ठेवली आहे. या निवडणुकीतही पैशांचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने यावर आळा घालण्यासाठी चोवीस तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. काही गैरप्रकार आढळल्यास नियंत्रण कक्षाला कळवावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.PUNE NEWS

जनतेला जागरूक करण्याचा उद्देश
विधानपरिषदेच्या निवडणुकीत प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रोख रकमेबाबत आणि मौल्यवान वस्तूंविषयी माहिती देण्यासाठी नागरिक आणि राज्यातील जनतेला जागरूक करण्याचा यामागील उद्देश आहे. मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आयकर विभागाने स्थानिक प्राधिकारी नेमले असून, ते नेमून दिलेल्या मतदारसंघासाठी या निवडणूक नियंत्रण कक्षाद्वारे चोवीस तास कार्यरत असतील. पुणे, ठाणे, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, सातारा, रायगड- रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी हा कक्ष कार्यरत असेल. आचारसंहिता लागू असेपर्यंत हा नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे.PUNE NEWS
माहिती देण्यासाठी संपर्क
व्हॉट्सअॅप क्रमांक - ९४०४५६९४७६; ई-मेल आयडी - pune.pdit.inv@incometax.gov.in पत्ता- नियंत्रण कक्ष, खोली क्रमांक ८२६, आठवा मजला, आयकर सदन, बोधी टॉवर, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, पुणे - ४११०३७.
PUNE NEWS


