Skip to content

PUNE NEWS: डिजिटल प्रशासन आणि नागरिक-केंद्रित सेवा क्षेत्रात मनपाचे ऐतिहासिक यश

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ मध्ये पुणे महापालिकेच्या पीएमसी ३६० प्रकल्पाची सिल्व्हर अवॉर्डसाठी निवड

PG
Prashik Ghaste

1 min read

PUNE NEWS: डिजिटल प्रशासन आणि नागरिक-केंद्रित सेवा क्षेत्रात मनपाचे ऐतिहासिक यश

राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ मध्ये पुणे महापालिकेच्या पीएमसी ३६० प्रकल्पाची सिल्व्हर अवॉर्डसाठी निवड

निलेश राऊत
पुणे: पुणे महापालिकेने डिजिटल प्रशासन आणि नागरिक-केंद्रित सेवा क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक यश संपादन करत राष्ट्रीय स्तरावर मानाचा सन्मान मिळविला आहे. भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ मध्ये पुणे महापालिकेच्या ‘पीएमसी ३६०’ या महत्त्वाकांक्षी डिजिटल परिवर्तन प्रकल्पाची ‘ई-गव्हर्नन्स अंतर्गत जिल्हा/शहरी स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावरील उपक्रम’ या श्रेणीत सिल्व्हर अवॉर्डसाठी निवड करण्यात आली आहे.PUNE NEWS

महापालिकेच्या वतीने गेल्या काही कालावधीत डिजिटल परिवर्तनाची व्यापक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या संकेतस्थळाचे संपूर्ण आधुनिकीकरण, विविध डिजिटल प्रणालींची पुनर्रचना, नवीन नागरिकाभिमुख सेवा प्रणालींची निर्मिती तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सेवा विकसित करण्यात आल्या. या सर्व उपक्रमांचे सादरीकरण नवी दिल्ली येथे तज्ज्ञ समितीसमोर करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील मूल्यमापन प्रक्रियेत ‘पीएमसी ३६०’ प्रकल्पाची निवड करण्यात आली. विविध विभागांच्या समन्वयातून हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आला.

एआय आधारित तंत्रज्ञानाचा विविध प्रकल्पांमध्ये वापर
‘पीएमसी ३६०’ प्रकल्पाच्या अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन सेवा पोर्टल, तक्रारींचे विश्लेषण व व्यवस्थापन, व्हॉटसअॅप सेवा, तक्रार निवारण, माहिती उपलब्ध करून देणे यासाठी नागरिकाभिमुख वापर करण्यात येत आहे. पालिकेच्या वतीने एआय आधारित तंत्रज्ञानाचा विविध प्रकल्पांमध्ये वापर सुरु करण्यात आला आहे.PUNE NEWS

डिजिटल परिवर्तनाची व्यापक मोहीम
पुणे महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) प्रजीत नायर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सिस्टीम अॅडमिनीस्ट्रेटर राहुल जगताप यांच्या सहकार्याने महापालिकेच्या वतीने गेल्या काही कालावधी मध्ये डिजिटल परिवर्तनाची व्यापक मोहीम राबविण्यात आली.

PUNE NEWS

Share