Skip to content

Pune News : जुनी मानसिकता असती तर पुण्यातील मेट्रोला आणखी दशके लागली असती"; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर जोरदार घणाघात

•पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेचे आणि विविध प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; महाराष्ट्रातील मेट्रो जाळ्याच्या विस्तारावर आणि विकासावर भर

V
Vivek

1 min read

Pune News : जुनी मानसिकता असती तर पुण्यातील मेट्रोला आणखी दशके लागली असती"; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर जोरदार घणाघात

•पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेचे आणि विविध प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; महाराष्ट्रातील मेट्रो जाळ्याच्या विस्तारावर आणि विकासावर भर

पुणे :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या नव्या विस्तार प्रकल्पांचे आणि हिंजवडी ते शिवाजीनगर जोडणाऱ्या मेट्रो मार्गिकेचे (पिंक लाईन) ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. सुमारे 21 हजार 800 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांमुळे पुण्यातील वाहतूक अधिक सुटसुटीत होणार असून नागरिकांच्या प्रवासाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर आणि जुन्या कार्यपद्धतीवर കडक शब्दांत टीका केली.

"जुनी मानसिकता असती तर मेट्रोचे काम दशकांपासून रखडले असते"

Photos · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

विरोधकांचा समाचार घेताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जर देशात आणि राज्यात तीच जुनी सरकारे आणि जुनी विचारसरणी कायम असती, तर पुणे मेट्रोचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दशके लागली असती. मात्र, एनडीए सरकारच्या वेगवान आणि सर्वसमावेशक धोरणांमुळे आज विकासाच्या कामांना अभूतपूर्व गती मिळाली आहे. मेट्रोच्या या जाळ्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात 'ईज ऑफ लिव्हिंग' आणि 'ईज ऑफ ट्रान्सपोर्टेशन' प्रत्यक्षात उतरत असल्याचे त्यांनी नमूद केले. आज भारताचे मेट्रो नेटवर्क जगातील शीर्ष तीन देशांमध्ये समाविष्ट झाले असल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील मेट्रो आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, सध्या महाराष्ट्रात सुमारे पावणेदोनशे किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे सेवेत असून, जवळपास 680 किलोमीटरच्या लाईनचे काम वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रातील मेट्रो इन्फ्रास्ट्रक्चरवर अडीच लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जात असून, या माध्यमातून मजूर, अभियंत्यांपासून ते स्थानिक उद्योग व दुकानांपर्यंत मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Mumbai Crime News : 17 वर्षांपासून फरार असलेला हत्येतील मुख्य आरोपी टिटवाळ्यातून जेरबंद; मुलुंड पोलिसांची धडक कारवाई

Share