Skip to content

PUNE NEWS : शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवरायांना अभिवादन

जिल्हा मुख्यालयात सोहळ्याचे आयोजन; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

PG
Prashik Ghaste

1 min read

PUNE NEWS : शिवस्वराज्य दिनानिमित्त शिवरायांना अभिवादन

जिल्हा मुख्यालयात सोहळ्याचे आयोजन; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

पुणे PUNE NEWS: पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आज जिल्हा मुख्यालयात शिवस्वराज्य दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी उपस्थिती लावत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.PUNE NEWS

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने शिवरायांच्या विचारांचा व स्वराज्याच्या प्रेरणादायी वारशाचा जागर करण्यात आला.PUNE NEWS

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.

PUNE NEWS

Share