Skip to content

PUNE NEWS : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन

१९९९ मध्ये कॉंग्रेसच्यावतीने ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले.

DO
Dhanshree Otari

2 min read

PUNE NEWS : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन

१९९९ मध्ये कॉंग्रेसच्यावतीने ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले.

महाराष्ट्र मिरर
पुणे, PUNE NEWS
: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जालिंदर कामठे यांचे बुधवारी (दि. १ जुलै) पहाटे झोपेत निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, एक बहीण आणि तीन भाऊ आणि नातवंडे असा परिवार आहे.PUNE NEWS

पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती जयश्री कामठे या त्यांच्या पत्नी होत. दरम्यान, कामठे यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने एक धडाडीचा नेता गमावला आहे. जालिंदर कामठे यांच्या आई हौसाबाई कामठे यांचे तीन महिन्यांपूर्वीच निधन झाले. हवेली तालुक्यातील कोंढवा बुद्रुक हे जालिंदर कामठे यांचे मूळ गाव आहे. ते कोंढवा बुद्रुक (ता. हवेली) येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्षही होते.PUNE NEWS

जालिंदर कामठे यांचा राजकीय प्रवास हा १९८६ मध्ये काँग्रेस पक्षापासून सुरू झाला. ते माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री दिवंगत रामकृष्ण मोरे यांचे खंदे समर्थक व सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात असत‌‌.PUNE NEWS

पुणे जिल्हा परिषदेच्या सन १९९७ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ते कॉंग्रेसच्या तिकिटावर पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. त्यानंतर दि.२१ मार्च १९९९ मध्ये कॉंग्रेसच्यावतीने ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर तीनच महिन्यात कॉंग्रेसचे विभाजन झाले. या विभाजनानंतर पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या सरकारी बंगल्यावरच दि. १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला.

दरम्यान, त्यांनी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानची स्थापना केली. या प्रतिष्ठानच्या वतीने चार प्राथमिक व माध्यमिक शाळा, दोन कनिष्ठ महाविद्यालय आणि एक वरिष्ठ महाविद्यालय सुरू केले. नुकतीच त्यांनी लॉ कॉलेजची परवानगी मिळवली होती. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग सहा वर्षे जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी काही काळ पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (कात्रज डेअरी) तज्ज्ञ संचालक म्हणूनही काम पाहिले.PUNE NEWS

जालींदर कामठे यांनी भूषविलेली राजकीय पदे: सरपंच, कोंढवा बुद्रुक येवलेवाडी --- सन १९८९ ते १९९७; अध्यक्ष एन.एस.यु.आय. --- सन १९८६ ते १९९२; सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस --- सन १९९३ ते १९९५; अध्यक्ष पुणे जिल्हा युवक काँग्रेस --- सन १९९५ ते १९९९; अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद --- दि. २१ मार्च १९९९ ते २० मार्च २००२; अध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस --- सन २०१४ ते २०१८; सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष --- सन २०१८ ते २०२०; भाजप पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष; सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस --- सन २०२५ पासून आजतागायत.

PUNE NEWS

Share