Skip to content

Pune News | आता पुण्यात कृत्रिम पाऊस ! महापौर नागपुरे यांचं सूचक विधान

पुण्यात व धरण पाणलोट क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत महापालिकेकडून चाचपणी

M
Mubarak

1 min read

Pune News | आता पुण्यात कृत्रिम पाऊस ! महापौर नागपुरे यांचं सूचक विधान

  • पुण्यात व धरण पाणलोट क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत महापालिकेकडून चाचपणी
  • महाराष्ट्र मिरर
    निलेश राऊत, पुणे, २९ जून :
    Pune News

    मान्सूनच्या आगमनानंतरही पुणे व पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने, आता पुणे महापालिकेकडून या सर्व भागात कृत्रिम पाऊस पाडता येईल का याबाबत चाचपणी सुरू करण्यात येणार आहे. Pune News


    याबाबत महापौर मंजुषा नागपुरे यांनी पक्षनेत्यांच्या बैठकीत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना सूचना दिल्या आहेत. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कोणती संस्था काम करते, याचा किती फायदा होईल याबाबत माहिती घेऊन तपशील लवकर सादर करण्याबाबत प्रशासनास सांगण्यात आले आहे. Pune News


    सध्या पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रात केवळ ३.६० टीएमसी पाणी साठा असून तो केवळ पुढील दोन महिने पुरेल एवढाच आहे. दरम्यान आता भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या भगत म्हणजे शहराच्या पूर्व भागातही पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


    आषाढी वारी निमित्ताने पालखी सोहळा येत्या ९ व १० जुलै रोजी पुण्यात मुक्कामी आहे. या दोन दिवसांसाठी शहरातील पाणी कपात स्थगित करण्यात येणार असून, दोन दिवस २४ तास पाणीपुरवठा होणार असल्याचे महापौर नागपुरे यांनी सांगितले. यावेळी सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित होते.

    नसरापूरच्या ‘असूरा’ला फाशीच ! पुण्याचे खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांची प्रतिक्रिया -https://www.instagram.com/p/DaKu_zyITzf

    Share