PUNE NEWS : मनपाच्या मिळकतकर विभागातील ८ कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
विभागीय चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली एका लिपिकाला १० हजारांचा दंड
1 min read

विभागीय चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली एका लिपिकाला १० हजारांचा दंड
पुणे PUNE NEWS: पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागातील कामातील हलगर्जीपणा आणि कामचुकारपणामुळे आठ कर्मचाऱ्यांविरोधात विभागीय चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून एका कनिष्ठ लिपिकावर १० हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. संबंधित कर्मचाऱ्याची बदलीही करण्यात आली आहे.PUNE NEWS

मिळकतकर विभागाकडे नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात येत आहे. मिळकतींचे मूल्यमापन न करणे, प्रकरणे विनाकारण प्रलंबित ठेवणे आणि कामकाजात निष्काळजीपणा केल्यामुळे नागरिकांसह महापालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक चौकशीत निदर्शनास आले आहे.PUNE NEWS
विविध पदांवरील कर्मचाऱ्यांचा समावेश
या प्रकरणात विभागीय निरीक्षक, पेठ निरीक्षक, अधीक्षक, उपअधीक्षक आणि वरिष्ठ लिपिक अशा विविध पदांवरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मिळकतकर विभागाने आठ कर्मचाऱ्यांविरोधात विभागीय चौकशीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला होता. मात्र, एका कर्मचाऱ्याच्या चौकशीसाठी सुमारे ३२ हजार रुपये खर्च येत असल्याने संबंधित विभागाला त्यांच्या अधिकारात आर्थिक दंडाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.PUNE NEWS
दरम्यान, औंध क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कनिष्ठ लिपिकाने आपल्या अधिकारक्षेत्राबाहेरील शिवणे परिसरातील नामांतरण प्रकरण हाताळल्याचे उघड झाले. या अनियमिततेबद्दल त्याच्यावर १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्याचा विभागीय चार्ज काढून बदली करण्यात आली आहे.
महापालिकेच्या मिळकतकर विभागातील इतर संबंधित कर्मचाऱ्यांवरही आर्थिक दंडाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणामुळे विभागातील कामकाज आणि जबाबदारीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
PUNE NEWS


