PUNE NEWS : पुणे महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी
'खलिस्तान नॅशनल आर्मी'कडून धमकी देण्यात येत असल्याचा दावा
1 min read

'खलिस्तान नॅशनल आर्मी'कडून धमकी देण्यात येत असल्याचा दावा
पुणे PUNE NEWS: पुणे महापालिकेच्या मुख्य कार्यालय व माननीय महापौर कार्यालय या ठिकाणी बॉम्बस्फोटा बाबतचा ईमेल खलिस्तान नॅशनल आर्मी कडून प्राप्त झाला आहे. 'ऑपरेशन ब्लू स्टार'चा बदला घेण्यासाठी तीन ठिकाणी बॉम्ब करणार असल्याचा उल्लेख सदर ई-मेलमध्ये करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या सूचनेनुसार संपुर्ण मुख्य इमारत खाली करण्यात आली आणि बॉम्ब शोधक पथकाने शोधकार्य सुरु केले. शोधकार्य पूर्ण झाल्यानंतर मुख्य इमारतीमधील कामकाज पुन्हा सुरु झाले. तोपर्यंत पुणे महानगरपालिका आवारात कोणालाही प्रवेश देण्यात येत नव्हता.PUNE NEWS
आरएसएसचे मुख्यालय आणि विधान भवन यांनाही धमकी
मिळालेल्या ई-मेलनुसार पुणे महापौर कार्यालय, नागपूरमधील आरएसएसचे मुख्यालय आणि विधान भवन या तिन्ही कार्यालयांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी महापौर कार्यालयाला सदर ई-मेल प्राप्त झाला.
'ऑपरेशन ब्लू स्टार'चा बदला घेण्यासाठी
ई-मेलमध्ये बॉम्बस्फोटाचा उल्लेख करण्यात आला असून, काही विशिष्ट वेळा आणि तारखांचाही संदर्भ देण्यात आला आहे. आर एस एस ने 'ऑपरेशन ब्लू स्टार'ला पाठिंबा दिला होता याचा बदला घेण्यासाठी हे कृत्य करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल मध्ये 'ऑपरेशन वूडरोज'चा देखील उल्लेख आहे.PUNE NEWS
कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही
धमकीचा ई-मेल मिळताच पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच सायबर विभाग सतर्क झाला असून, ई-मेलची सत्यता आणि त्यामागील व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.PUNE NEWS
सध्या कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसून, सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसरात सुरक्षा वाढवली आहे. ई-मेल कोणत्या ठिकाणाहून पाठवण्यात आला, तो खरा आहे की बनावट, याची तपासणी यंत्रणांकडून केली जात आहे.
PUNE NEWS


