Skip to content

PUNE NEWS : १५ जूनपासून भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले;

दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य

PG
Prashik Ghaste

1 min read

PUNE NEWS : १५ जूनपासून भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले;

दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य

पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर येथील शिवमंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर आज, १५ जून २०२६ पासून भाविकांच्या दर्शनासाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. मंदिर परिसरातील भव्य सभामंडप व इतर विकासकामांमुळे ९ जानेवारी २०२६ पासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते.PUNE NEWS

सन २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन मंदिर परिसरात सभामंडप, पायरी मार्ग तसेच विविध सुविधा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. अवघ्या पाच महिन्यांत सभामंडपाचे प्रमुख काम पूर्णत्वास आले असून उर्वरित विकासकामे अंतिम टप्प्यात आहेत.PUNE NEWS

मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थान भोरगिरी ट्रस्ट यांनी मंदिर १५ जूनपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सुरुवातीच्या काळात दर्शनासाठी काही नियम व अटी लागू राहणार आहेत.

ऑनलाइन नोंदणीशिवाय प्रवेश नाही

मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य केली आहे. यासाठी भाविकांना shreebhimashankar.com⁠ वर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.PUNE NEWS

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार-

दररोज केवळ १,००० भाविकांना प्रवेश दिला जाणार.

१५ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत सकाळी ७ ते ११ या वेळेतच दर्शनाची सुविधा उपलब्ध असेल.

ऑनलाइन नोंदणी केलेल्या भाविकांनी वैध ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक राहील.

नोंदणीकृत भाविकांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नोंदणी प्रक्रिया

दर्शनासाठी नोंदणी करताना भाविकांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन मोबाईल क्रमांक व ई-मेलच्या माध्यमातून खाते तयार करावे. त्यानंतर दर्शनाची तारीख व वेळ निवडून आवश्यक माहिती भरल्यानंतर पुष्टीकरण पावती डाउनलोड करावी लागेल.PUNE NEWS

मंदिर संस्थानने भाविक, स्थानिक नागरिक तसेच सर्व संबंधितांनी मंदिर प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मंदिर पुन्हा खुले झाल्याने राज्यभरातील शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

PUNE NEWS

Share