Skip to content

PUNE NEWS : पुणे-पिंपरी चिंचवडच्या स्वच्छ हवेच्या दिशेने मोठे पाऊल; डीएसएस प्रणालीचे उद्घाटन

सीआयआय, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांचा संयुक्त उपक्रम

PG
Prashik Ghaste

2 min read

PUNE NEWS : पुणे-पिंपरी चिंचवडच्या स्वच्छ हवेच्या दिशेने मोठे पाऊल; डीएसएस प्रणालीचे उद्घाटन

सीआयआय, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांचा संयुक्त उपक्रम

पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी स्वच्छ हवेच्या व्यवस्थापनाला बळ देणारी अत्याधुनिक निर्णय सहाय्य प्रणाली (Decision Support System – DSS) सोमवारी सुरू करण्यात आली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (सीआयआय) ‘क्लीनर एअर बेटर लाईफ’ उपक्रमांतर्गत पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या सहकार्याने आयोजित बहु-हितधारक स्वच्छ हवा मंचात या प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले.PUNE NEWS

या मंचाचे नेतृत्व पीएमसी आयुक्त नवल किशोर राम आणि सीआयआयच्या ‘क्लीनर एअर बेटर लाईफ’ उपक्रमाच्या अध्यक्षा श्वेता आर्य यांनी केले.PUNE NEWS

कार्यक्रमात बोलताना श्वेता आर्य यांनी सांगितले की, २०१६ पासून सीआयआयने उद्योग, सरकार, संशोधन संस्था, शिक्षणतज्ज्ञ आणि नागरी समाज यांना एकत्र आणून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी व्यवहार्य उपाय शोधण्याचे काम केले आहे. २०२३ मध्ये पुण्यात सुरू करण्यात आलेल्या ‘क्लीनर एअर बेटर लाईफ’ उपक्रमाला आता बहु-हितधारक मंच आणि कृती आराखड्याच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूप देण्यात येत आहे.PUNE NEWS

यावेळी पीएमसी आयुक्त नवल किशोर राम यांनी स्वच्छ हवा हा केवळ पर्यावरणाचा विषय नसून शहराच्या एकूण विकासाशी निगडित असल्याचे स्पष्ट केले. “हवेची गुणवत्ता ही ध्वनी प्रदूषण, जलव्यवस्थापन, हरित क्षेत्र, शहरी पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या जीवनमानाशी थेट संबंधित आहे. त्यामुळे स्वच्छ हवा हे स्वतंत्र उद्दिष्ट नसून शहराच्या सर्वांगीण नियोजनाचा परिणाम म्हणून पाहिले पाहिजे,” असे ते म्हणाले.PUNE NEWS

बैठकीदरम्यान ‘क्लीनर एअर बेटर लाईफ’ कृती योजनेच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्राधान्यक्रमाच्या उपाययोजना, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि सामायिक कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. सरकार, उद्योग, शैक्षणिक क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि स्टार्टअप्सच्या प्रतिनिधींनीही प्रदूषण नियंत्रणासाठी विविध कल्पना आणि उपाय सुचवले.

‘क्लीनर एअर बेटर लाईफ’ उपक्रम
शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शासन, उद्योग, संशोधक, शैक्षणिक संस्था, नागरी समाज आणि स्टार्टअप्स यांना एकत्र आणण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. एअरव्हॉइसने विकसित केलेली ही डीएसएस प्रणाली पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील हवेच्या गुणवत्तेचा ७२ तासांपर्यंतचा उच्च-रिझोल्यूशन अंदाज देण्यास सक्षम आहे. स्थानिक उत्सर्जनाची माहिती, हवामान अंदाज आणि प्रगत वातावरणीय मॉडेलिंगच्या आधारे ही प्रणाली संपूर्ण क्षेत्रासाठी १ किलोमीटर रिझोल्यूशनवर तासागणिक वायू गुणवत्तेचा अंदाज तयार करते.PUNE NEWS

स्वच्छ आणि निरोगी वातावरण निर्मितीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशासनाला प्रदूषणाची संभाव्य केंद्रे ओळखणे, प्रदूषणाच्या घटनांचा पूर्वानुमान घेणे, वेळेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आणि प्रदूषण नियंत्रणाच्या प्रयत्नांचे मूल्यमापन करणे शक्य होणार आहे. परिणामी, वायू प्रदूषणाविरोधातील लढाई अधिक वैज्ञानिक, डेटा-आधारित आणि परिणामकारक होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते. या नव्या डीएसएस प्रणालीमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वायू प्रदूषण नियंत्रणासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणार असून, नागरिकांना अधिक स्वच्छ आणि निरोगी वातावरण मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

PUNE NEWS

Share