PUNE NEWS : पुणे विमानतळावर १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबणाऱ्या वाहनांना ५०० रुपयांचा दंड
वाहतूककोंडी रोखण्यासाठी नव्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर नवीन नियम लागू होण्याची शक्यता
1 min read

वाहतूककोंडी रोखण्यासाठी नव्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर नवीन नियम लागू होण्याची शक्यता
पुणे PUNE NEWS: पुणे विमानतळ परिसरातील वाढती वाहतूककोंडी कमी करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या आणि ड्रॉप-ऑफ झोनमध्ये १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबणाऱ्या वाहनांवर ५०० रुपयांचा दंड आकारण्याचा प्रस्ताव विमानतळ प्रशासनाकडून मांडण्यात आला आहे.PUNE NEWS

पुणे विमानतळावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करत असतात. त्यांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येणाऱ्या वाहनांमुळे प्रवेशद्वार आणि ड्रॉप-ऑफ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होते. अनेक वाहने आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ थांबत असल्याने मागील वाहनांच्या रांगा वाढतात आणि प्रवाशांना टर्मिनलपर्यंत पोहोचण्यासाठी विलंब सहन करावा लागतो.
'ड्युअल टाइम' प्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव
या पार्श्वभूमीवर विमानतळ प्रशासनाने वाहतूक अधिक शिस्तबद्ध आणि सुरळीत करण्यासाठी 'ड्युअल टाइम' प्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या नियमानुसार ड्रॉप-ऑफ क्षेत्रात वाहनांना केवळ १५ मिनिटांचा कालावधी दिला जाईल. त्यानंतरही वाहन तेथे आढळल्यास संबंधित वाहनधारकावर ५०० रुपयांचा दंड आकारला जाईल.PUNE NEWS
विमानतळ प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, वाहन क्रमांकाच्या आधारे दंडाची कार्यवाही केली जाणार असून त्यामुळे प्रवेशद्वारावरील अनावश्यक गर्दी कमी होण्यास मदत होईल.
याबाबत माहिती देताना संतोष ढोके यांनी सांगितले की, "विमानतळाच्या प्रवेशद्वारावर १५ मिनिटांचा 'ड्युअल टाइम' लागू करण्याबाबत प्रस्ताव देण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. या उपाययोजनांमुळे वाहतूककोंडी कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचेल आणि विमानतळ व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल."PUNE NEWS
प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर नवीन नियम लागू होण्याची शक्यता असून, विमानतळावर येणाऱ्या वाहनचालकांना वेळेचे नियोजन करूनच ड्रॉप-ऑफ क्षेत्राचा वापर करावा लागणार आहे.
PUNE NEWS


