Skip to content

Pune News : शिवसृष्टीजवळील भुयारी मार्गात वाहतूक कोंडी; पादचाऱ्यांचीही गैरसोयवाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिस अधिकारी नेमण्याची नागरिकांची मागणी

Pune News : पुणे: खडी, खड्डे, धूळ आणि वाहतूककोंडी, असे आंबेगाव बुद्रुक येथील शिवसृष्टी परिसरातील रोजचे चित्र झाले आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

शिवसृष्टीजवळील भुयारी मार्गात वाहतूक कोंडी; पादचाऱ्यांचीही गैरसोयवाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिस अधिकारी नेमण्याची नागरिकांची मागणी
शिवसृष्टीजवळील भुयारी मार्गात वाहतूक कोंडी; पादचाऱ्यांचीही गैरसोयवाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिस अधिकारी नेमण्याची नागरिकांची मागणी

Pune News : पुणे: खडी, खड्डे, धूळ आणि वाहतूककोंडी, असे आंबेगाव बुद्रुक येथील शिवसृष्टी परिसरातील रोजचे चित्र झाले आहे. येथील नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, छोटे-मोठे अपघातही नित्याचे झाले आहेत. शिवसृष्टीजवळील भुयारी मार्गात एकेरी तसेच दुहेरी वाहतूक सुरू असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. विशेषतः सकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

शिवसृष्टीजवळील भुयारी मार्गातून सिंहगड कॉलेज रस्त्याच्या दिशेने जाणाऱ्या तसेच कात्रजवरून नवले पुलाकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. याशिवाय सिंहगड कॉलेज रस्त्यावरून नवले पूल आणि नऱ्हे परिसराकडे जाणाऱ्या वाहनांचीही या मार्गावर मोठी गर्दी होते. त्यामुळे सकाळच्या कार्यालयीन वेळेत दुचाकी, चारचाकी वाहने आणि बसगाड्यांची संख्या वाढल्याने भुयारी मार्गाच्या परिसरात वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

या मार्गावर एकाच वेळी विविध दिशांनी वाहने येत असल्याने वाहतुकीचे नियोजन विस्कळीत होते. परिणामी, वाहनांच्या रांगा लागून वाहनचालकांना बराच वेळ कोंडीत अडकून पडावे लागते. रस्त्यावरील खड्डे आणि धुळीमुळेही नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे.

पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

वाहतूककोंडीचा फटका पायी चालणाऱ्या नागरिकांनाही बसत आहे. रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना तसेच सुरक्षितपणे चालताना कसरत करावी लागते. वाहनांची सततची वर्दळ आणि अपुऱ्या वाहतूक नियोजनामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वाहतूक पोलिस नेमण्याची मागणी

शिवसृष्टीजवळील भुयारी मार्गातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, वाहनांची कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. “या परिसरात राँग साईडने वाहन चालवणे, ट्रिपल सीट प्रवास आणि बेदरकार वाहनचालकांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. दररोज हजारो विद्यार्थी आणि नोकरदार या भुयारी मार्गाचा वापर करतात. त्यातच पाण्याचे टँकर आणि स्कूल बसची मोठी वर्दळ असते. टँकरमधून रस्त्यावर सांडणाऱ्या पाण्यामुळे वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वाहतूक कोंडीसोबतच नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करावी आणि अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.” आशिष भोसले
सदस्य, स्वराज्य पक्ष

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share