Skip to content

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना पुणे मनपाकडून विनम्र अभिवादन

अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्या उपस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली ‘अहिंसेची’ शपथ

PG
Prashik Ghaste

1 min read

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना पुणे मनपाकडून विनम्र अभिवादन

अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्या उपस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली ‘अहिंसेची’ शपथ

पुणे: भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पुणे महानगरपालिकेत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. या निमित्ताने मनपा मुख्य इमारतीमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. प्रजित नायर यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन
राजीव गांधी यांची पुण्यतिथी हा दिवस देशभरात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणून पाळला जातो. याच औचित्याने पुणे महानगरपालिका भवन परिसरात उपस्थित असलेल्या सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी, सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत सामूहिक शपथ घेतली. देशातील शांतता, सामाजिक सलोखा, अहिंसा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजात आणखी दृढ करण्यासाठी सर्व मनपा सेवकांनी यावेळी प्रतिज्ञा घेतली.

अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना, देशाच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी शांतता व अहिंसा ही मूल्ये किती महत्त्वाची आहेत, यावर भर दिला.

पुणे न्यूज

Share