Pune metro : पुणे मेट्रो लाईन 3 प्रवासी सेवेसाठी पूर्णपणे सज्ज; उद्घाटनासाठी राज्य सरकारच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा
Pune metro: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि बहुप्रतिक्षित असलेली हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो लाईन 3 आता प्रवासी सेवेसाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे.
2 min read

Pune metro : CMRS कडून सुरक्षा मंजुरी प्राप्त; मान–हिंजवडी ते बालेवाडीदरम्यानचा 13 किमीचा पहिला टप्पा सुरू होण्याच्या उंबरठ्यावर
Pune metro: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि बहुप्रतिक्षित असलेली हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो लाईन 3 आता प्रवासी सेवेसाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वैधानिक आणि तांत्रिक मंजुऱ्या पूर्ण झाल्या असून, मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त (CMRS) यांच्याकडून सुरक्षा मंजुरीदेखील प्राप्त झाली आहे. मात्र, प्रत्यक्ष मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून उद्घाटनाची तारीख निश्चित होणे अद्याप बाकी असल्याने प्रवाशांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
FRA च्या ‘बेकायदा’ शुल्कवाढीमुळे विद्यार्थी-पालकांना कोट्यवधीचा आर्थिक भुर्दंड
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो लाईन 3 च्या पहिल्या टप्प्यात मान–हिंजवडी ते बालेवाडीदरम्यानचा सुमारे 13 किलोमीटरचा उन्नत (Elevated) मार्ग आणि स्थानक क्रमांक 1 ते 12 यांचा समावेश आहे. या संपूर्ण मार्गावरील बांधकाम, तांत्रिक चाचण्या आणि सुरक्षा तपासण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत.Pune metro

प्रारंभी जुलै 2026 च्या सुरुवातीला मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, सीएमआरएसची अंतिम सुरक्षा मंजुरी वेळेत न मिळाल्यामुळे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले. जुलैअखेरीस आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर आता मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्यास कोणताही तांत्रिक अडथळा शिल्लक राहिलेला नाही.
Coep शुल्कवाढीवरून अभाविप आक्रमक
PMRDA सध्या राज्य सरकारशी उद्घाटनाच्या तारखेबाबत वरिष्ठ स्तरावर समन्वय साधत असून, सरकारचा अंतिम निर्णय होताच मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि अन्य वरिष्ठ मान्यवरांच्या उपलब्धतेनुसार तारीख निश्चित केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.Pune metro

हिंजवडी आयटी पार्क, मान, बालेवाडी आणि परिसरातील हजारो आयटी कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक या मेट्रो सेवेची अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत आहेत. सेवा सुरू झाल्यानंतर मुंबई–बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, तसेच सार्वजनिक वाहतुकीला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मेट्रो लाईन 3 हा पुण्यातील महत्त्वाकांक्षी सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांपैकी एक असून, संपूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर हिंजवडी आयटी हब ते शिवाजीनगर दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे. त्यामुळे शहरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येवरही मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.Pune metro

PMRDA चे अधिकृत निवेदन
"हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो लाईन 3 च्या पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक सर्व वैधानिक आणि तांत्रिक मंजुऱ्या प्राप्त झाल्या आहेत. सीएमआरएसची सुरक्षा मंजुरी मिळाल्यामुळे मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी पूर्णपणे सज्ज आहे. उद्घाटनाची तारीख निश्चित करण्याबाबत राज्य सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा असून, सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे," असे PMRDA ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.Pune metro
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)


