Skip to content

Pune News : दिवाळीच्या खरेदीत नागरिक व्यस्त; फळबाजाराकडे पाठ, संत्रा-मोसंबीची मागणी घटली

Pune News :पुणे : दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठेत खरेदीची लगबग सुरू असून, नागरिकांचा कल कपडे, फराळ आणि दिवाळीच्या साहित्याच्या खरेदीकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

दिवाळीच्या खरेदीत नागरिक व्यस्त; फळबाजाराकडे पाठ, संत्रा-मोसंबीची मागणी घटली
दिवाळीच्या खरेदीत नागरिक व्यस्त; फळबाजाराकडे पाठ, संत्रा-मोसंबीची मागणी घटली

Pune News :पुणे : दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठेत खरेदीची लगबग सुरू असून, नागरिकांचा कल कपडे, फराळ आणि दिवाळीच्या साहित्याच्या खरेदीकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे फळांच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. परिणामी, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डातील फळबाजारात फळांची मागणी घटली आहे. मागणीच्या तुलनेत आवक अधिक असल्याने संत्रा, मोसंबी, ड्रॅगन फ्रूट, लिंबू, कलिंगड आणि खरबुजाच्या दरात घसरण झाली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
मार्केटयार्डातील फळबाजारात लिंबू, मोसंबी, संत्रा, डाळिंब, पपई, कलिंगड, खरबूज, चिक्कू, पेरू, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट आणि सफरचंदाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. मात्र, दिवाळीच्या खरेदीत नागरिक व्यस्त असल्याने फळांच्या खरेदीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बाजारात फळांची मागणी कमी झाली असून, त्याचा परिणाम दरावर झाला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फळबाजारातील व्यवहार काहीसे मंदावल्याचे चित्र आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

फुलबाजारात आवक वाढल्याने दरात घसरण
कोजागरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केटयार्डातील फुलबाजारात फुलांच्या आवकसह मागणीतही वाढ झाली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत फुलांची आवक अधिक झाल्याने बाजारातील दरात १० ते २० टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे फुलांच्या बाजारात दर नरमले असल्याची माहिती फुलांचे अडते सागर भोसले यांनी दिली.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share