Skip to content

Pune News : पुणे मशीन टूल,फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोमधून प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, उद्योगातील नव्या संधींचे सादरीकरण

Pune News पुणे : इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IMTMA) यांच्या वतीने आयोजित पुणे मशीन टूल एक्स्पो (PMTX) 2026 आणि त्यासोबत आयोजित फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पो (FACTEQ) 2026 चे आज पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (PIECC), मोशी, पुणे येथे उद्घाटन करण्यात आले.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

पुणे मशीन टूल एक्स्पो,फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोमधून प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, उद्योगातील नव्या संधींचे सादरीकरण
पुणे मशीन टूल एक्स्पो,फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोमधून प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, उद्योगातील नव्या संधींचे सादरीकरण

Pune News पुणे : इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IMTMA) यांच्या वतीने आयोजित पुणे मशीन टूल एक्स्पो (PMTX) 2026 आणि त्यासोबत आयोजित फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पो (FACTEQ) 2026 चे आज पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (PIECC), मोशी, पुणे येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.https://maharashtramirror.com/ Pune News
या प्रदर्शनाचे उद्घाटन टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लिमिटेडचे व्हाइस चेअरमन श्री. अरविंद गोयल यांच्या हस्ते झाले. यावेळी IMTMAच्या अध्यक्षा सौ. मोहिनी केळकर, IMTMAचे उपाध्यक्ष श्री. विक्रम साळुंके आणि IMTMAचे महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिबक दासगुप्ता उपस्थित होते.https://maharashtramirror.com/ Pune News
उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. अरविंद गोयल यांनी स्थानिक उत्पादन क्षमतेवर भर दिला. ते म्हणाले, भारतातील वाढती उत्पादन परिसंस्था मशीन टूल उद्योगासाठी मोठ्या संधी निर्माण करत आहे. भारत हा दरवर्षी अपेक्षित असलेल्या विकासासाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्याची गरज अधोरेखित करताना गोयल म्हणाले की, मशीन टूल्ससाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे भारतात अधिक मजबूत उत्पादन व्यवस्था उभारण्याची गरज आहे. तसेच, जगातील किमान तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मशीन टूल उत्पादक होण्याचे लक्ष्य उद्योगाने ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.https://maharashtramirror.com/ Pune News

Share