Pune Crime: अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची ६४ लाखांची फसवणूक
पुणे, महाराष्ट्र मिरर : मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी कारवायांना निधी पुरविल्याच्या प्रकरणांत नाव असल्याचे सांगून कोथरूडमधील ७५ वर्षीय महिलेला अटकेची भीती दाखविण्यात आली.
1 min read

Pune Crime: फोनचा ताबा घेऊन ६४ लाख ६० हजार रुपये हस्तांतरित
पुणे, महाराष्ट्र मिरर : मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी कारवायांना निधी पुरविल्याच्या प्रकरणांत नाव असल्याचे सांगून कोथरूडमधील ७५ वर्षीय महिलेला अटकेची भीती दाखविण्यात आली. त्यानंतर त्यांच्या फोनचा ताबा घेऊन एकूण ६४ लाख ६० हजार रुपये हस्तांतरित करून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
याप्रकरणी महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाईलधारक, बँक खातेधारक आणि वापरकर्त्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, ३० मार्च २०२३ ते ६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून ही फसवणूक झाली. आरोपीने महिलेला व्हॉट्सॲपवर कॉल करून, तुम्ही अश्लील छायाचित्रे किंवा व्हिडिओ पाठवून पैसे कमविता, असा आरोप केला. तसेच मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी कारवायांना निधी पुरविल्याच्या प्रकरणांत त्यांचे नाव असल्याचा दावा करून अटकेची भीती दाखविली. त्यानंतर त्यांच्या फोनचा ताबा घेऊन पैसे हस्तांतरित करून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता देवकाते पुढील तपास करीत आहेत.


