Skip to content

Pune Crime : मोबाईल हिसकावणारे दोघे कोंढवा पोलिसांच्या जाळ्यात

Pune crime पुणे, महाराष्ट्र मिरर : कोंढव्यातील प्राईम हॉस्पिटलसमोर व्हिडिओ कॉलवर बोलत असलेल्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून दुचाकीवरून पसार झालेल्या दोघांना कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले.

VK
Vikrant Kulkarni

2 min read

मोबाईल हिसकावणारे दोघे कोंढवा पोलिसांच्या जाळ्यात
मोबाईल हिसकावणारे दोघे कोंढवा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Crime : सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा माग; सहा मोबाईलसह मोपेड जप्त

Pune crime पुणे, महाराष्ट्र मिरर : कोंढव्यातील प्राईम हॉस्पिटलसमोर व्हिडिओ कॉलवर बोलत असलेल्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून दुचाकीवरून पसार झालेल्या दोघांना कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. त्यांच्याकडून ६० हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली एक मोपेड जप्त करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ pune crime

सफी उल्ला हापीज उल्ला शहा (वय १८, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, मूळ रा. बलरामपूर, उत्तर प्रदेश) आणि मेहताब जलालुद्दीन चौधरी (वय २०, रा. अश्रफनगर, कोंढवा खुर्द, मूळ रा. बलरामपूर, उत्तर प्रदेश) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.https://maharashtramirror.com/ pune crime

कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास कोंढव्यातील कमेला परिसरातील प्राईम हॉस्पिटलसमोर ही घटना घडली. तक्रारदार रस्त्यावर मोबाईलवर व्हिडिओ कॉल करीत होते. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून मोपेडवरून दोन तरुण आले. मोपेड चालविणाऱ्या तरुणाने पांढऱ्या रंगाचा शर्ट, तर मागे बसलेल्या तरुणाने लाल रंगाचा शर्ट घातला होता.https://maharashtramirror.com/ pune crime

मोपेड तक्रारदाराजवळ येताच मागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर दोघांनी कोंढव्याच्या दिशेने भरधाव वेगाने पलायन केले. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर तक्रारदाराने कोंढवा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. पोलीस अंमलदार शाहिद रजपूत, प्रशांत खाडे आणि पोलीस हवालदार कारखेले यांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. फुटेजमधील मोपेड आणि संशयितांच्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तसेच स्थानिक माहितीच्या मदतीने त्यांचा माग काढला.

तपासादरम्यान सफी उल्ला शहा आणि मेहताब चौधरी यांच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता या गुन्ह्यात त्यांचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून एकूण सहा मोबाईल हस्तगत करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे ६० हजार रुपये आहे. तसेच एक मोपेडही पोलिसांनी जप्त केली आहे. जप्त केलेले अन्य मोबाईल आणखी काही गुन्ह्यांशी संबंधित आहेत का, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त रामदास इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत मंडले आणि संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, सागर पवार, पोलीस हवालदार रविंद्र चिप्पा, मेमागणे, अमोल हिरवे, कारखेले तसेच पोलीस अंमलदार शाहिद रजपूत, प्रशांत खाडे, रशिद शेख, रियाज पटेल, केशव हिरवे, संतोष बनतुडे, सुरज शुक्ला, अमित सूर्यवंशी, राहुल शेलार, पुष्पेंद्र चव्हाण, ओंकार शोटे, रवि जाधव आणि रासगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Share