Pune News : कात्रज चौकात वाहतूक वळविली, अवजड वाहनांना प्रवेशबंदी; पर्यायी मार्ग जाहीर
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे कात्रज चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
1 min read

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे कात्रज चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना कात्रज चौक परिसरात प्रवेशबंदी लागू करण्यात आली असून, वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune news
गेल्या शनिवारपासून (दि.१७)प्रायोगिक तत्त्वावर हे वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार डंपर, ट्रेलर, कंटेनर आणि सिमेंट मिक्सर यांसारख्या अवजड वाहनांना कात्रज चौकात प्रवेश करता येणार नाही.
पुणे-सातारा महामार्गावरून जुन्या कात्रज बोगद्यामार्गे येणाऱ्या अवजड वाहनांना शिंदेवाडी येथे, तर नवीन कात्रज बोगद्यामार्गे येणाऱ्या वाहनांना नवले पूल येथे रोखण्यात येणार आहे. तसेच हडपसर, सोलापूर, मंतरवाडी आणि बोपदेव घाटमार्गे येणाऱ्या अवजड वाहनांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
अवजड वाहनांसाठी नवले पूल, नवीन कात्रज बोगदा, खेड शिवापूर, सासवड आणि मंतरवाडी या मार्गांचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करता येणार आहे. दरम्यान, कात्रज चौक परिसरातील काही रस्त्यांवर पार्किंगलाही बंदी घालण्यात आली आहे. वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.


