Skip to content

Pune News : पुण्याच्या ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरीदानपेटी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास; सीसीटीव्हीत चोरट्याच्या हालचाली कैद

Pune News :पुणे, मिरर: पुण्याचे ग्रामदैवत आणि पहिल्या मानाचे श्री कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

पुण्याच्या ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरीदानपेटी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास;
पुण्याच्या ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरीदानपेटी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास;

Pune News :पुणे, मिरर: पुण्याचे ग्रामदैवत आणि पहिल्या मानाचे श्री कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्याने मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील अंदाजे ६० हजार रुपयांची रोकड लंपास केली. ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या मंदिरातच चोरी झाल्याचे समोर आल्याने शहरातील भाविक आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी (५ ऑक्टोबर) मध्यरात्री एक ते पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली. मंदिर परिसरात शांतता असताना अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर गाभाऱ्याजवळील दानपेटीवर त्याने लक्ष केंद्रित केले. दानपेटीचे कुलूप आणि बिजागरी तोडून त्यातील रोकड काढल्यानंतर चोरटा मंदिरातून पसार झाला..https://maharashtramirror.com/ Pune News

दरम्यान, सकाळी नियमित पूजेसाठी मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी आले असता दानपेटी फुटलेल्या अवस्थेत आढळली. पेटीतील रोकड गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ फरासखाना पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मंदिर परिसर तसेच आसपासच्या भागाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली. मंदिरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यामध्ये संशयित चोरट्याच्या हालचाली कैद झाल्याची माहिती आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याने मंदिरात प्रवेश कसा केला, दानपेटी कशाप्रकारे फोडली आणि चोरीनंतर कोणत्या मार्गाने पलायन केले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. चोरट्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे.

याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुण्याच्या मध्यवर्ती पेठेत असलेल्या प्रतिष्ठित मंदिरात चोरी झाल्याने मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रात्रीची गस्त वाढवून मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी, अशी मागणी भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे. चोरट्याचा लवकरच शोध घेण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share