Skip to content

Pune Crime : देशी-विदेशी दारूची बेकायदा विक्री करणारे दोघे जेरबंद

दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले

VK
Vikrant Kulkarni

1 min read

पुणे शहरात देशी-विदेशी दारूची बेकायदा विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हे शाखेच्या युनिट-३ने कारवाई केली.
पुणे शहरात देशी-विदेशी दारूची बेकायदा विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हे शाखेच्या युनिट-३ने कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी १ लाख २४ हजार ६३५ रुपये किमतीची देशी-विदेशी दारू जप्त केली असून, दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

तब्बल १.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त https://maharashtramirror.com/


पुणे : पुणे शहरात देशी-विदेशी दारूची बेकायदा विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हे शाखेच्या युनिट-३ने कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी १ लाख २४ हजार ६३५ रुपये किमतीची देशी-विदेशी दारू जप्त केली असून, दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखा युनिट-३चे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, सहायक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे व पथक अवैध धंद्यांवर कारवाई तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करीत होते. १४ ऑगस्ट रोजी पहाटे तीनच्या सुमारास पथकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, साईनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड परिसरात एक व्यक्ती देशी-विदेशी कंपनीची दारू बेकायदा विक्रीसाठी ठेवून आहे. (Maharashtra mirror) https://maharashtramirror.com/

माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून अंकितकुमार सुरजन बिंद (वय २०, रा. साईनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्या खोलीची झडती घेतली असता बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ठेवलेली देशी-विदेशी दारू मिळून आली. या दारूबाबत चौकशी केली असता ती त्याचा मित्र आदित्य राजू शिंदे (रा. गल्ली नं. ८६, शंकर मंदिराजवळ, जनता वसाहत, पुणे) याची असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आदित्य शिंदे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्याकडूनही दारू असल्याची खात्री झाल्यानंतर दोघांकडून मिळून १ लाख २४ हजार ६३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईनंतर दोन्ही आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. https://maharashtramirror.com/

ही कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) तेजस्विनी सातपुते, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट-३चे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम, सहायक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे तसेच राजेंद्र नलावडे, वाघमारे, काटकर, किशोर शिंदे, लिहिणे, जगदाळे, बोडरे, गुंडाळ, झेंडे आणि राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली. (Maharashtra mirror)

Share