Skip to content

Pune News : मालधक्का चौकाजवळ धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने ओंकार अंकुश जोशी (वय ३४, रा.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

मालधक्का चौकाजवळ धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी अज्ञात वाहनचालक अपघातानंतर पसार; बंडगार्डन पोलिसांकडून शोध सुरू
मालधक्का चौकाजवळ धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी अज्ञात वाहनचालक अपघातानंतर पसार; बंडगार्डन पोलिसांकडून शोध सुरू

Pune News : अज्ञात वाहनचालक अपघातानंतर पसार; बंडगार्डन पोलिसांकडून शोध सुरू

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने ओंकार अंकुश जोशी (वय ३४, रा. गणेश कॉम्प्लेक्स, टिंगरेनगर) यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले सुहास मच्छिंद्र तपासे (वय ३७, रा. निंबाळकरनगर, लोहगाव) जखमी झाले. बोल्हाई चौक ते मालधक्का चौक रस्त्यावर २६ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासे आणि जोशी हे दुचाकीवरून मालधक्का चौकाच्या दिशेने जात होते. बोल्हाई चौक ओलांडल्यानंतर सुमारे १०० ते १५० मीटर अंतरावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात जोशी गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला, तर तपासे जखमी झाले. वाहनचालक अपघातानंतर घटनास्थळी न थांबता आणि पोलिसांना माहिती न देता पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४ (अ), १३४ (ब)/१८७ आणि ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालकाला अद्याप अटक झालेली नाही. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Share